Bicholim | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa festival: साखळीतील ‘वाळवंटी’ काठी भक्तांची दाटी!

Goa festival: नौकाविहार स्पर्धेला प्रतिसाद : विठ्ठलापूर येथे त्रिपुरारी पौर्णिमा; उत्साहाचे वातावरण

दैनिक गोमन्तक

Goa festival: दीपदान, नौकाविहार स्पर्धा आदी पारंपरिक कार्यक्रम आणि हजारो भाविकांच्या साक्षीने विठ्ठलापूर-साखळी येथील प्रसिद्ध त्रिपुरारी उत्सवाला सोमवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या विठ्ठलापुरात सायंकाळी ते मध्यरात्रीपर्यंत उत्साह संचारला होता.

'कोरोना'च्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा साजरा झालेल्या या उत्सवाला पर्यटकांसह नागरिकांची वाळवंटी काठी गर्दी उसळली होती. राज्यस्तरीय 'नौकाविहार' स्पर्धा यामुळे विठ्ठलापूर-साखळी येथील 'त्रिपुरारी पौर्णिमा' गोव्यासह शेजारील राज्यांमध्ये प्रसिद्धीस पावली आहे.

या उत्सवाला राज्यमान्यता मिळाल्यापासून राज्य सरकारचे पर्यटन, कला आणि संस्कृती, माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि विठ्ठलापूर दीपावली उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गर्दी उसळल्याने पोलिस आणि वाहतूक पोलिसांवर ताण आला होता.

सायंकाळी 7.30 वा. भगवान श्रीकृष्ण मिरवणूक झाल्यानंतर वाळवंटी नदीपात्रात दीपदानाचा कार्यक्रम झाला. सुवासिनी आदी भक्तांनी पेटते दीप नदीपात्रात सोडले. श्री पांडुरंग देवस्थानच्या प्रांगणात अलंकारतर्फे 'रसिकरंजन गीत नृत्य आविष्कार’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही रंगला.

दरम्यान, त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे नौकाविहार स्पर्धा. या स्पर्धेत यंदाही आकर्षक नौका सहभागी झाल्या होत्या. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा वाळवंटी नदीपात्रात ही मध्यरात्रीपर्यंत ही स्पर्धा रंगली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT