Dasara Puja | Market Dainik Gomantak
गोवा

Dasara Puja 2022: डिचोलीत फुलला 'झेंडूं'चा बाजार

Dasara Puja 2022: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर डिचोलीत लाल-पिवळ्या झेंडू फुलांनी बाजार फुलला आहे.

दैनिक गोमन्तक

Dasara Puja 2022: विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर डिचोलीत लाल-पिवळ्या झेंडू फुलांनी बाजार फुलला आहे. यंदा मात्र झेंडू फुलांची आवक काहीशी घटल्याचे जाणवत आहे. स्थानिक झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेजारील राज्यांतून झेंडू फुले विक्रीस उपलब्ध झाली आहेत.

दसरोत्सव काळात डिचोलीत जवळपास दहा टन झेंडू फुलांची विक्री होते. झेंडू फुलांची आवक कमी असल्याने या फुलांचा भावही वाढला आहे. दरम्यान, डिचोलीत यंदाही राज्याबाहेरील विक्रेत्यांचा आकडा अधिक असल्याचे आढळून येत असून, हे विक्रेते बाजारासह मोक्याच्या ठिकाणी झेंडू फुलांची विक्री करताना दिसून येत आहेत.

मर्यादित पुरवठ्यामुळे भाव वधारला

दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने या फुलांचा भाव वाढला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत 120 ते 150 रुपये प्रतिकिलो या दराने फुलांची विक्री होत होती. काही विक्रेते फुलांच्या तयार माळांची विक्री करताना दिसून येत होते.

40 ते 60 रुपये मीटर असे या माळांचे दर आहेत. दसऱ्याच्या पूर्वदिनी संध्याकाळपर्यंत बाजारात उपलब्ध झालेल्या झेंडूच्या फुलांपैकी जवळपास 60 टक्के फुलांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून मिळाली.

गावठी झेंडू कुठे?

गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य शेजारील राज्यांतून डिचोलीत झेंडू फुलांची आवक होत असते. पावसामुळे यंदा कर्नाटक राज्यात झेंडू फुलांच्या बहरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा विक्रेत्यांनी महाराष्ट्रातून झेंडू फुलांची आयात केली आहे. स्थानिक मळेही बहरले नसल्याने क्वचित अपवाद सोडल्यास गावठी झेंडूची फुलेही बाजारात दिसून येत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT