Goa Police 
गोवा

Goa Police: नार्वेतील देवस्थानच्या सचिवाविरुद्ध नागरिक एकवटले; पोलिसांकडे कारवाईची मागणी!

Goa Police: देवस्थानच्या सचिवांकडून सतावणूक आणि धमकावण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: नार्वे येथील एका प्रसिद्ध देवस्थानच्या सचिवांकडून आमची सतावणूक होत असून धमकावण्यातही येत आहे, अशी लेखी निवेदनवजा तक्रार देऊळवाडा-नार्वे येथील नागरिकांनी डिचोली पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणी डिचोली पोलिसांनी काल शुक्रवारी तक्रारदार नागरिक आणि संबंधित देवस्थानच्या सचिवांना पोलिस स्थानकात बोलावून नागरिक आणि सचिवाची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी बोलाविल्याप्रमाणे स्थानिक पंच तुकाराम गावडे यांच्यासह नंदा नार्वेकर मिळून नागरिकांचा गट शुक्रवारी सकाळी पोलिस स्थानकात हजर झाला. मात्र, दुपारपर्यंत देवस्थानचे सचिव पोलिस स्थानकात हजर झाले नाहीत. त्यामुळे नागरिक संतप्त बनले. नागरिक पोलिस स्थानकाबाहेरच ठाण मांडून होते. दुपारी सचिव पोलिस स्थानकात हजर झाले.

निवेदनावर 58 नागरिकांच्या सह्या

देऊळवाडा येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर 58 नागरिकांनी सह्या केल्या आहेत. देवस्थानचे सचिव देवस्थान परिसरातील तळीत स्नान करण्यास तसेच पूजा आदी धार्मिक विधी करण्यास मज्जाव करीत आहेत, मंदिर परिसरात फिरकण्यासही प्रतिबंध करीत आहेत. इतकेच नव्हे, तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात येत आहे. बंद पडलेल्या सरकारी शाळेत मजुरांना ठेवण्यात आले आहे आदी मुद्दे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT