Goa: At Gavaran, which is full of water Chirekhan Tukaram Sawant
गोवा

Goa: डिचोलीत चिरेखाणी असुरक्षित

डोह तुडुंब भरल्याने धोका (Goa)

Sandeep Survekamble

डिचोली ः (Bicholim Goa) काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे (rain) चिरेखाणींचे डोह आता तुडूंब भरले आहेत. डिचोलीच्या काही भागातील चिरेखाणी असुरक्षित आणि तेवढ्याच धोकादायक (Dangerous) असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्‍यात चिरेखाणींचे प्रस्थ वाढलेले आहे. या चिरेखाणींवर प्रशासनाचे कडक नियंत्रण नसल्याचे आढळून येत आहे. (The administration of found to lack strict control) यापूर्वी नानोडा येथे एका चिरेखाणीत बुडाल्याने दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. अन्य काही चिरेखाणीत गुरे (Cattle) आणि अन्य जनावरे बुडून मृत्यूमुखी पडण्याच्याही घटना घडल्या आहेत. (there have been cases of animals drowning any dying) मये (Mayem), नानोडा (Nanoda) या भागात काही वर्षांपासून चिरेखाणी बंद आहेत. पावसाळ्यात चिरेखाणी बंद असतात. जोरदार पावसावेळी सगळ्या चिरेखाणी पाण्याने तुडूंब भरतात. (During heavy rains, all the creeks fill up with water) सध्याही बहुतेक चिरेखाणी पाण्याने भरलेल्या आहेत. पावसाळ्यात सुरक्षेच्यादृष्टीने संबंधितांकडून चिरेखाणी सभोवताली कुंपण वा अन्य कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. (No Fening or other measures have been taken around Chirekhani) परिणामी या चिरेखाणी म्हणजे मृत्यूचे सापळे बनत आहेत.

Goa: डिचोली (Bicholim) तालुक्‍यातील म्हावळिंगे-कुडचिरे (Mavlinguem-kurchare), आमठाणे, उसप, लाटंबार्से (Latambarse), कारापूर (Karapur), आदी काही ठराविक भागात चिरेखाणींचा व्यवसाय जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात मिळून ३०च्या आसपास चिरेखाणी आहेत. बांधकामांसाठी चिरे अत्यावश्‍यक असल्याने चिरेखाणींना सुगीचे दिवस आले असले, तरी या चिरेखाणींवर कोणतेच निर्बंध नसल्याचे जाणवत आहे. खाण आणि भूगर्भ खाते (Mines and geology Department) किंवा स्थानिक पंचायतींचे (panchayat) लक्ष नसल्याने व्यवसायिकांचे (Businessman) आयतेच फावत आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात (In August last Year) तालुक्‍यातील नानोडा येथील तुडूंब भरलेल्या एका चिरेखाणीत दहा वर्षीय बालक बुडण्याची घटना घडली होती. (Ten year old boy had drowned) पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नानोडा येथील एका फार्मपासून काही अंतरावर असलेल्या आणि पाण्याने तुडूंब भरलेल्या चिरेखाणीत पडल्याने कळंगूट (Calangute) येथील अरिफ पंच म्हालदार हे दहा वर्षीय बालक बुडण्याची घटना घडली होती. या दुघर्टनेनंतर चिरेखाणींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. आता अशी घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. सद्यःस्थितीत काही चिरेखाणी सभोवती सुरक्षा कुंपण वा अन्य आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही चिरेखाणी धोकादायक अवस्थेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT