Bicholim Car Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

Sarmanas Ferry Point Car Accident: डिचोली येथील सारमानस फेरीधक्क्यावर एक धक्कादायक दुर्घटना घडली.

Manish Jadhav

डिचोली: डिचोली येथील सारमानस फेरीधक्क्यावर (Sarmanas Ferry Point) एक धक्कादायक दुर्घटना घडली. येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार (Car) थेट पाण्यात बुडाली. मात्र, सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने कारमधील चालकाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालक आपले वाहन फेरी धक्क्याजवळ घेत असताना, नेमके कशा कारणाने नियंत्रण सुटले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नियंत्रण सुटल्यामुळे कार धक्क्यावरुन घसरली आणि ती पाण्यात बुडाली.

कार पाण्यात पडल्याचे लक्षात येताच, जवळ असलेल्या स्थानिक नागरिक आणि तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता त्वरित पाण्यात उडी घेतली. या जागरुक नागरिकांच्या मदतीमुळे कारमधील चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पाण्यात बुडालेली मोटारगाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. कार काढण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळ वापरले जात आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT