Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

Bhausaheb Bandodkar: भाऊसाहेब बांदोडकरांचे भव्य स्मारक हवे- खलप

रमाकांत खलप: शासकीय पातळीवर पुण्यतिथी साजरी करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Bhausaheb Bandodkar भाऊसाहेब बांदोडकर यांची 50 वी पुण्यतिथी 12 ऑगस्ट रोजी येत असून राज्य सरकारने ती सरकारी पातळीवर साजरी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केली असून मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले आहे.

त्याचप्रमाणे, भाऊसाहेबांचे पर्वरीत भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व इतरांनी हेवेदावे बाजूला ठेवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यासंदर्भात अ‍ॅड. खलप यांनी मंगळवारी म्हापशात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. अ‍ॅड. खलप पुढे म्हणाले, वीस वर्षांपूर्वी भाऊसाहेब मेमोरियल ट्रस्टची स्थापना केलेली. त्यावेळी स्थानिक कोमुनिदादने पर्वरीत जागाही दिलेली.

त्यानुसार, पर्वरीत भाऊसाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न झाले परंतु त्यास खीळ बसली. अशावेळी आता हे स्मारक उभारण्यासाठी सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित यावे व भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता पुढाकार द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. खलप यांनी केली.

बांदोडकरांनी गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, असे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, सार्वमतानुसार बांदोडकारांनी जनमत कौल मान्य केला. त्यानंतर त्यांनी विलीनीकरणाचा विषय कधीच काढला नाही.

गोव्यातील जमिनींचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी कठोर कायदे तथा कुळ-मुंडकार कायदा अस्तित्वात आणला. गोव्याचा विकास व्हावा म्हणून भाऊसाहेबांनी विविध योजना व कार्यक्रम राबविले. मातृभाषेत त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले.

त्यांनी शैक्षणिक व औद्योगिक क्रांती घडविली. अशा थोर व्यक्तिमत्वाचे तसेच सर्व पक्षीय नेत्याचे स्मारक होणे नितांत गरजेचे आहे. या स्मारकाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रेरणास्थान मिळेल, असेही खलप म्हणाले.

तिकिटासाठी भांडलो नाही!

खलप म्हणाले, मागील अनेक वर्षे मी राजकारणात सक्रिय आहे. या काळात मी कधीच तिकीट मागितले नाही किंवा भांडलो नाही. मुळात तिकीट कुणाला द्यावे हा पक्षाचा निर्णय. त्यांनी उमेदवारांचे मूल्यांकन करायचे असते.

माध्यमांनी खलपांना तुम्ही लोकसभेसाठी दावा करणार का? असे विचारले असता त्यांनी थेट बोलणे टाळले. परंतु, आपली अनिच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT