Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

कचरापेट्या घोटाळाप्रकरणी गोवा खंडपीठ करणार पुन्‍हा विचार

याचिकेवरील सुनावणी येत्या सोमवार दि. 11 एप्रिलला ठेवली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कथित कचरापेटी खरेदी घोटाळाप्रकरणी लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशावर नव्याने व स्वतंत्रपणे विचार केला जाईल, असे मत आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तोंडी नोंदवून इनासिओ परेरा यांच्या याचिकेवरील सुनावणी येत्या सोमवार दि. 11 एप्रिलला ठेवली आहे.

राज्यातील समुद्रकिनारी कचरा स्वच्छतेसाठी खरेदी करण्यासाठी ‘दृष्टी’ कंपनीला सरकारने कोणतीही निविदा न काढता परवानगी दिली होती. त्यानंतर निविदा न काढताच त्याची बिलेही सरकारने मंजूर केली होती. कचरापेटीच्या घोटाळ्यासंदर्भात प्राथमिक चौकशीत तथ्य असल्याचे निरीक्षण सप्टेंबर 2020 मध्‍ये तत्कालीन लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याची चौकशी करण्याची शिफारस सरकारला केली होती.

परंतु गोवा सरकारने लोकायुक्तांनी आदेशात केलेल्या शिफारशीनुसार त्याची चौकशी न करण्याचा निर्णय घेतला होता व त्याची कार्यवाही बंद करण्याची विनंती नवीन लोकायुक्तांकडे केली होती. या लोकायुक्तांनी सरकारने दिलेले उत्तर समाधानी असल्याचे नोंद करत त्याला मान्यताही दिली होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने गोवा सरकारच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

समुद्रकिनारी स्वच्छतेचे काम ‘दृष्टी’ला देण्यात आले होते. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या कचरापेटींसाठीची निविदा काढण्याची आवश्‍यकता असताना सरकारने कंपनीलाच ती खरेदी करण्यास सांगितले होते. त्यानंतरही सरकारने निविदा काढली नाही व अधिक कचरापेट्या खरेदी करण्यात आल्या. ही प्रक्रिया नियमानुसार नसून त्यामध्ये मोठा घोटाळा असल्याची तक्रार याचिकादाराने गोवा लोकायुक्तांकडे दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT