Goa Bench Of Bombay High Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Bench : वकिलाकडून झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर निर्णय द्या!

याचिकेवरील सुनावणीअंती खंडपीठाने याचिकादाराच्या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर निर्णय देण्याचा आदेश देत याचिका निकालात काढली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bench : जमीन व्यवहारासंदर्भातील प्रकरणात ॲड. श्रीकांत नायक यांनी फसवणूक केल्याची तक्रार वास्कोतील मुन्नालाल हलवाई यांनी केली होती. मात्र, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने कोणताच निर्णय दिला नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती. या याचिकेवरील सुनावणीअंती खंडपीठाने याचिकादाराच्या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर निर्णय देण्याचा आदेश देत याचिका निकालात काढली.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडे हलवाई यांनी 13 नोव्हेंबर 2015 रोजी ॲड. नायक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याची चौकशी प्रलंबित होती व त्यासाठी तारीखही निश्‍चित केली होती. ही चौकशी पूर्ण न झाल्याने ती बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे वर्ग केली होती. या चौकशीची सुनावणी पूर्ण करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 30 ऑगस्ट 2018 रोजी पुन्हा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडे पाठविली होती. त्यामुळे हलवाई यांनी चौकशीबाबतच्या चालढकलपणाबाबत 29 ऑक्टोबर 2021 रोजी ही याचिका सादर केली होती. बार कौन्सिल ऑफ इंडियाला याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी सुरू करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती. याचिकेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, बार कौन्सिल ऑफ इंडिया व ॲड. नायक यांना प्रतिवादी केले होते.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कोर्टात चेंडू

तक्रारीसंदर्भात चौकशी अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेऊन ती 28 सप्टेंबर 2022 रोजी पूर्ण केली. लवकरच त्याचा अहवाल बार कौन्सिल ऑफ इंडियाला पाठविला जाईल, अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने दिल्याने आता बार कौन्सिल ऑफ इंडिया त्यावर निर्णय घेईल.

एक महिन्यात अहवाल पाठवा

या तक्रारीवरील सुनावणीला विलंब झाल्याचे याचिकादाराच्या वकील गौतमी कामत यांनी निदर्शनास आणून दिले ते बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा प्रकरणामध्ये लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने हा अहवाल एका महिन्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवावा, असे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT