Tourist Safety Dainik Gomantak
गोवा

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

AI Surveillance Goa: राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘बीच व्हिजिल ॲप’ अपग्रेड करण्यासह ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानाच्या आधारे समुद्रकिनारे तसेच इतर ठिकाणी देखरेख ठेवण्यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘‘राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘बीच व्हिजिल ॲप’ अपग्रेड करण्यासह ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानाच्या आधारे समुद्रकिनारे तसेच इतर ठिकाणी देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आपण चर्चा करणार आहे’’, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘‘किनारी भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून दलालांची संख्या वाढत आहे. हे दलाल पर्यटकांना केवळ जलक्रीडा प्रकारांच्या तिकिटांची विक्री करीत नाहीत, तर ते बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या प्रकारांतही गुंतलेले आहेत. अशा दलालांवर कारवाई करून पर्यटकांना सुरक्षा देण्याच्या अनुषंगाने नुकतीच आपण पोलिस महासंचालक आलोक कुमार व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्यासोबत बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळीही गस्त घाला!

‘‘दलाल केवळ दिवसाच नाही, तर रात्रीच्यावेळीही पर्यटकांची सतावणूक करीत आहेत. त्यांच्याकडून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही होत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्यावेळीही गस्त घालून अशा टाऊट्सवर कारवाई करावी, अशा सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत’’, असेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

विकासाचे आकडे वाढले, मग गोमंतकीय सुखी का नाहीत?; निवडणुकीआधी जनतेच्या अपेक्षांचा हिशेब मांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT