Goa Beach Shack Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

Goa Beach Shack 20 Lakh Fine: पात्र अर्जदारांची संख्या शॅकच्या संख्येपेक्षा अधिक असल्यास सोडत पद्धतीने निवड केली जाईल आणि एका कुटुंबातील एका सदस्यालाच एक शॅक मिळू शकेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील शॅकसाठी आता तीन सलग पर्यटन हंगामांसाठी परवाना देण्याची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या हंगामानंतर शुल्क भरून पुढील दोन हंगामांसाठी परवाना नूतनीकरण करता येणार आहे. राज्य सरकारने बीच शॅक धोरणाला एक वर्षांची मुदतवाढ देणारी अधिसूचना आज जारी केली.

यानुसार पात्र अर्जदारांची संख्या शॅकच्या संख्येपेक्षा अधिक असल्यास सोडत पद्धतीने निवड केली जाईल आणि एका कुटुंबातील एका सदस्यालाच एक शॅक मिळू शकेल. खासगी मालमत्तेतील सीआरझेड क्षेत्रातील तात्पुरत्या शॅकची नोंदणीही बंधनकारक करण्यात आली आहे.

विनापरवाना शॅक उभारल्यास २० लाख रुपयांपर्यंत दंड, तसेच पूर्वसूचनेशिवाय शॅक पाडून साहित्य जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटक व्यवसायाची नोंदणी न केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड, दंड न भरल्यास दररोज ५०० ते १,००० रुपये दंडात्मक व्याज, तसेच व्यवसाय सील करून पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर तरतूदही नव्या कायद्यात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT