Shacks  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: "कळंगुट, कांदोळी, मांद्रे किनाऱ्यावरील शॅक्स रात्री 12 पर्यंत बंद झालेच पाहिजेत" उत्तर गोव्यात पोलिसांची भूमिका कठोर

Goa Police on Beach Shacks: मारहाणीच्या प्रसंगानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आता कळंगुट, कांदोळी आणि मांद्रे किनारपट्टीतील शॅक्स १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले

Akshata Chhatre

म्हापसा: उत्तर गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या मारहाणीच्या प्रसंगानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आता कळंगुट, कांदोळी आणि मांद्रे किनारपट्टीतील शॅक्स १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या आदेशाची अंमलबजावणी करत असून याचा फटका एकूण २३६ शॅक्सना बसला आहे.

आमच्याजवळ रात्री १ वाजेपर्यांत शॅक्स सुरु ठेवण्याचे आदेश असताना देखील पोलीस अशी सक्ती का करतायत असा प्रश्न शॅक मालक उपस्थित करत आहेत, तर यावर उत्तर देताना आम्ही नियमांचे पालन करत असल्याचं पोलीस म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी कळंगुट परिसरात झालेला पर्यटकाचा मृत्यू, कांदोळी आणि मांद्रे येथे पर्यटकांना मारहाण अशा घटनानंतर उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी या भागांमधील शॅक्स रात्री ११ वाजता बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांनतर आमदारांच्या विनंतीवरून ही मुदत १२ पर्यंत वाढवण्यात आली होती.

किनाऱ्यांवर वाढणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी आता रात्रीच्यावेळी शॅक्स बंद झाल्यानंतर कुणालाही किनाऱ्यावर फेरफटका मारता येणार नाही किंवा मद्य प्राशन करता येणार नाही. रात्री १० वाजेपर्यंत किनाऱ्यावरील शॅक्समधलं संगीत बंद होतं मात्र परवान्यासह शॅक्स मात्र रात्री ११ वाजेपर्यंत खुलेच असतात. मालकांच्या मते मध्यरात्री १ पर्यंत दारू विकण्याचा परवाना त्यांना अबकारी खात्याने दिलेला आहे आणि असे असताना देखील रात्री १२ पर्यंत शॅक बंद करण्याची सक्ती ही पटणारी नाही.

राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर शॅक्सबाबतचे नियम सामान आहेत, मात्र उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी आणि मांद्रे येथे वाढणाऱ्या गंभीर प्रकरणांमुळे त्यांच्यावर पोलिसांकडून करडी नाराज ठेवली जाईल. गोवा शॅक मालक कल्याण सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो यांच्या मते एक दोन शॅक मालकांमुळे सर्वांना धारेवर धरणं बरोबर नाही, सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT