Goa Beach Shack Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: "शॅक्सना रात्री उशिरा मद्यविक्रीचे परवाने दिल्यानेच अडचणी वाढतायत" स्थानिकांकडून नियम कठोर करण्याची मागणी

Goa Locals on Beach Shacks: शॅक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी शॅक्सवर कारवाई करावी

Akshata Chhatre

म्हापसा: पर्यटनासाठी प्रिय असलेल्या गोव्यात सध्या शॅक्सवरून वाद सुरु आहेत. कळंगुट, मोरजी आणि मांद्रे किनाऱ्यांवरील शॅक्स रात्री १२ पर्यंत बंद झालेच पाहिजेत असे आदेश देण्यात आलेत. गोव्यातले स्थानिक शॅक्सना विरोध करतायत. शॅक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी शॅक्सवर कारवाई करावी अशी मागणी केली जातेय.

स्थानिकांच्या मते गोव्यात मालकांनी काही शॅक्स अशा लोकांना दिलेत ज्यांच्याजवळ हे शॅक्स चालवण्याचे परवाने देखील नाहीयत. कदाचित पोलिसांना याबद्दल माहिती देखील नसेल, मात्र स्थानिकांच्या मते यावर वेळीच कारवाई केली गेली पाहिजे. गोव्यातील शॅक व्यवसाय हे नियमांनुसार चालले पाहिजेत आणि म्हणून पोलिसांनी वेळीच कारवाई करणं महत्वाचं आहे, यामुळे गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना देखील त्रास होणार नाही.

स्थानिक म्हणतायत की शॅक्सचा खरा व्यवसाय हा किनाऱ्यांवर अन्न पदार्थ पुरवणे हा आहे मात्र सध्या यात भलतेच बदल झाले असून मालकांनी शॅक्सचं रूपांतर क्लबमध्ये केलंय. गोव्यातील अनेक किनाऱ्यांवर सनबेड्सची मक्तेदारी पाहायला मिळतेय.

स्थानिक म्हणतायत की अबकारी परवाने हे देखील फाईव्ह स्टार हॉटेल्स पुरते मर्यादित ठेवले पाहिजेत, कारण शॅक्ससह व्यावसायिक आस्थापनांना रात्री उशिरा मद्यविक्रीचे परवाने दिल्यानेच अडचणींमध्ये वाढ होतेय. यामुळे भलतेच पर्यटक गोव्याच्या दिशेने वळतात, ज्याचा पर्यटन क्षेत्राला फायदा होत नाही.

गोव्यातील पर्यटन सुधारावे आणि इथल्या पर्यटनाची खरी ओळख जपण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी रहिवासी करत आहेत, स्थानिकांच्या मते सध्या सुरु असलेली परिस्थिती ही पर्यटन तसेच गोव्याच्या सामाजिक परिस्थितीला अनुकूल नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT