Goa Beach Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: तब्बल 450 शॅक होते, नोंदणीविनाच! शॅकवरही पर्यटन खात्याचा अंकुश; नोंदणी आता अनिवार्य

Goa Shack Registration: राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटन हंगामात खासगी जमिनींवर उभारण्यात येणाऱ्या शॅकपैकी तब्बल ४५० शॅक पर्यटन खात्याकडे नोंदणीविनाच सुरू होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटन हंगामात खासगी जमिनींवर उभारण्यात येणाऱ्या शॅकपैकी तब्बल ४५० शॅक पर्यटन खात्याकडे नोंदणीविनाच सुरू होते, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या पर्यटन हंगामात किनाऱ्यालगतच्या खासगी जमिनीवर एकूण ७४२ शॅक उभारण्यात आल्याचे पर्यटन खात्याच्या पाहणीत आढळले होते.

त्यानंतर खात्याने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत त्यापैकी केवळ २९० शॅकचीच नोंद पर्यटन खात्याकडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुमारे साडेचारशे शॅक कोणतीही नोंदणी न करता सुरू असल्याचे उघड झाले आहे. खासगी जमीन असल्याच्या कारणावरून आतापर्यंत नोंदणीपासून दूर राहिलेल्या या शॅकवर आता पर्यटन खात्याचा अंकुश राहणार आहे. खासगी जमिनीवर शॅक उभारायचा असल्यास त्याची पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे आता अनिवार्य करण्यातआले आहे.

सरकारी जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या शॅकना लागू असलेले नियम, अटी आणि निकष यापुढे खासगी जमिनीवरील शॅकनाही लागू होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत नियमांच्या कक्षेबाहेर राहिलेल्या शॅकचालकांना आता पर्यटन खात्याच्या नियमांचे पालन करावेलागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT