Goa Beach | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: किनाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन

Goa Beach: बेकायदेशीर व्यवहार सुरूच : कळंगुटमध्ये फोफावला जलक्रीडा व्यवसाय

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोव्यातील पर्यटनाचा दर्जा वाढवण्यासाठी पर्यटन खात्याचे प्रयत्न सुरू असून बेकायदेशीर व्यवहार थांबवण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी आदेश जारी केला होता. परंतु हा आदेश येऊन एक आठवडा पूर्ण झाला असला, तरी राज्यातील किनाऱ्यांवर अजूनही बेकायदेशीर व्यवहार सुरूच असल्याचे दिसून येते.

अनेक अवैध गोष्टी समुद्र किनाऱ्यांवर खुलेआमपणे सुरू आहेत. किनाऱ्यांवर जलक्रीडा अधिसूचित जागेतच करता येईल, असे स्पष्ट केले आहे. परंतु कळंगुट किनाऱ्यावर अधिसूचित केलेली जागा सोडून या व्यावसायिकांनी इतरत्रही व्यवसाय फैलावल्याचे दिसून येते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जलक्रीडांवर विशेष भर दिला असून पर्यटकांना त्रास देऊन बेकायदेशीरपणे व्यवहार करू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तरी देखील या आदेशाची अंमलबजावणी व्हायला आणखी थोडा काळ जावा लागणार असे दिसते. अनेक किनाऱ्यांवर जलक्रीडा व्यावसायिकांचे दलाल पर्यटकांच्या कच्छपी लागतात. त्यांच्यावर नियंणण आणणे गरजेचे आहे. किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने फिरते विक्रेतेही वस्तू घेऊन वावरत आहेत.

डेक बेडचे समुद्राला आलिंगन

पर्यटनविषयक नव्या आदेशात किनाऱ्यांवरील डेक बेडसंदर्भात देखील नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. परंतु गजबजलेल्या कळंगुट किनाऱ्यावर गेल्या वर्षीच्या तुलनेक यंदा डेक बेड वाढले आहेत. यंदा तर व्यावसायिकांनी निर्धारित सीमा ओलांडून थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत बेड, टेबल टाकले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी डेकबेड थेट अरबी समुद्रात जाणार की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

किनाऱ्यांवर पोचली वाहने

समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन नेण्यास बंदी आहे. तरीही असे प्रकार पर्यटकांकडून वारंवार घडत आहेत. यावर कारवाईचे अधिकार पोलिसांना आदेशाद्वारे दिले आहेत. तरीही किनाऱ्यांवर पर्यटक वाहने घेऊन जात असल्याचे दिसून येते. कळंगुट येथे पर्यटकांची गर्दी असतानाही किनाऱ्यावर महाराष्ट्र राज्याची नोंदणी असलेले वाहन रविवारी फिरताना दिसत होते.

पर्यटन खात्याने जारी केलेला आदेश चांगला असून पर्यटन उद्योगासाठी योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होण्यासाठी पर्यटन पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याची आवश्‍यकता आहे. सध्या पर्यटन पोलिसांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे शिस्त निर्माण व्हायला किमान दोन महिने तरी जावे लागतील.

- नीलेश शाह, अध्यक्ष, टीटीएजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT