Instagram Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: गोव्यात फक्त दारूची दुकानं, चहा पिल्यावर दंड? इन्फ्लुएंसर तरुणीला गोंयकाराचे सणसणीत उत्तर

गोव्याबद्दल अनेकांच्या मनात विविध गैरसमज आहेत.

Pramod Yadav

देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत असतात. गोव्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. चित्रपट, वेबसीरिज आणि सोशल मीडियावर समोर येणाऱ्या व्हिडिओंमधून गोव्याबद्दल एक चित्र निर्माण केले जाते. पण, गोव्याला इतिहास आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे.

दरम्यान, गोवा म्हणजे दारू, बिकिनी असे चित्र रंगवणाऱ्या सोशल मिडियावरील एका कथित इन्फ्लुएंसर तरूणीला गोंयकाराने व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय दिलाय.

झाले असे की एका तरूणीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून गोव्याबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत गोव्यातील झोमॅटोवर फक्त दारूच मिळते, चहा पिल्यावर दंड आकारला जातो आणि कपडे खरेदीला गेल्यावर फक्त बिकिनी मिळते अशा आशयाचा व्हिडिओ तरूणीने तिच्या 'थॉटफूल गर्ल' या अकाउंटवरून शेअर केल होता.

दरम्यान, या व्हिडिओला गोव्यातील एका इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या रूद्रने सणसणीत उत्तर दिले आहे.

गोव्यात आल्यावर तुम्ही रॉस ऑम्लेट, टोमॅटो भाजी, मिरची पाव खाऊ शकता. आणि मला माहीत नाही कोणत्या हॉटेलमध्ये तुमच्याकडून चहा पिण्यासाठी दंड घेतला? असे म्हणत रूद्रने तरूणीला सणसणीत उत्तर दिले आहे.

रूद्रने या व्हिडिओच्या माध्यमातून गोव्याची निर्माण केल्याली चुकीचा प्रतिमा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, त्याने केलेला हा व्हिडिओ कोणत्याही व्हिडिओ निर्मात्याच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही असेही म्हटले आहे.

दरम्यान, तरूणीने गोव्याबाबत भाष्य करणारा तिचा व्हिडिओ इन्स्टाग्राम वरून हटवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT