Par River Pollution Dainik Gomantak
गोवा

Par River: बार्देश तालुक्याच्या जीवनदायिनीचं अस्तित्व धोक्यात, ‘पार’ नदीला प्रदूषणाचा विळखा!

Par River Pollution: डिचोलीतील काही गावांसह संपूर्ण बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अस्नोड्याच्या ‘पार’ नदीवरील प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस भयानक बनत असल्याचे जाणवत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोलीतील काही गावांसह संपूर्ण बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अस्नोड्याच्या ‘पार’ नदीवरील प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस भयानक बनत असल्याचे जाणवत आहे. या नदीत प्लास्टिकसह दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात असून, नदीचे अस्तित्व संकटात आले आहे. या संकटाची दखल घेऊन पंचायत तसेच अन्य यंत्रणांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे.

डिचोलीतील (Bicholim) मुळगाव आणि शिरगावहून पुढे बार्देश तालुक्याला जोडलेली ‘पार’ नदी डिचोलीसह बार्देश तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. मात्र, याच नदीवर सध्या मानवनिर्मित प्रदूषणाचा आघात झाला आहे. कचऱ्यासह या नदीत सांडपाणी मिसळत असतानाच विविध ठिकाणी कपडे व गुरांना धुण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या नदीत काही ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी ही नदी स्वच्छ दिसत होती. मात्र, हळूहळू ती प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली. आता तर दिवसेंदिवस नदीत अस्वच्छता वाढत आहे.

कारवाईचे काय झाले?

‘पार’ नदीत कचरा टाकण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. नदीत कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पंचायतीने गेल्यावर्षी स्पष्ट केले होते. मात्र, कचरा टाकण्याचे आताचे प्रकार पाहून पंचायतीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

‘पार’ नदीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दंडात्मक कारवाईसह जनजागृती करण्याची गरज आहे. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांनीही नद्या वाचविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपली मानसिकता बदलून नदीत कचरा टाकण्याचे प्रकार बंद करावेत.

- आनंद नार्वेकर, नागरिक

बॉयलर कोंबड्यांचे अवशेष

‘पार’ नदीत प्लास्टिकसह निर्माल्य टाकण्याचे प्रकार चालूच असतात. त्याशिवाय काहीजण घरातील किंवा हॉटेलमधील कचरा आणि टाकाऊ पदार्थ नदीत टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. चिंतेची बाब म्हणजे बाजारातील काही चिकन विक्रेते बॉयलर कोंबड्यांचे अवशेष आणि विष्ठा नदीत टाकतात. मासे (Fish) विक्रेते टाकाऊ खराब मासळीही नदीत टाकतात, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे अस्नोडा पुलाजवळ नदीचा परिसर गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त बनला आहे. बंधाऱ्याला तर मोठ्या प्रमाणात कचरा अडकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT