Goa : Water in Bambolim subway. Dainik Goamantak
गोवा

Goa : बांबोळीचा भुयारी मार्ग जलमय

पादचारी, वाहनचालकांना अपघाताला निमंत्रण Goa

Mahesh Tandel, Sunil Sheth

कुठ्ठाळी : राष्ट्रीय महामार्ग (National Highway) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळासमोरील (Goa Medical Collage Hospital) भुयारी मार्ग (Subway) जलमय (under water) झाला आहे. त्‍यामुळे त्याचा फटका पादचारी, दुचाकी (Motorcyle) व चारचाकी वाहन (Vehicle) चालकांना बसत आहे. हा भुयारी मार्ग गुरांचेही (cattle) आश्रयस्‍थान बनला आहे. त्‍यामुळे वाहनचालक आणि लोकांचीही (Peoples) गैरसोय होत आहे.

गोवा वैद्यकीय इस्पितळातून किंवा दंतवैद्यकीय इस्पितळांतून ये - जा करणाऱ्या वाहनचालकांना याच भुयारी मार्गाचा अवलंब करून मडगाव किंवा पणजीचा मार्ग गाठावा लागतो. भुयारी मार्गातील पाणी खेचून काढण्यासाठी लावलेल्या पंपमुळे पाण्याची पातळी कमी झाली नाही. खेचलेले पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये साचते. त्‍यामुळे पादचारी भुयारी मार्गावरून रस्त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पाणी साचल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.

भटक्‍या गुरांचेही आश्रयस्‍थान
या भुयारी मार्गात भटकी गुरांनी आपले बस्तान मांडले आहे. त्‍यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना बराच त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्यावेळी धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे वाहनचालकांना समोर बसलेल्‍या गुरांचा अंदाज येत नाही. त्‍यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. संबंधितांनी पाण्‍याचा निचरा नीट कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच गुरांचाही बंदोबस्‍त करावा, अशी मागणी वाहनचालक तसेच लोकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT