Goa Baina Fish Market Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: दुरुस्तीच्या प्रतीक्षेत बायणा मासळी मार्केट; मुरगाव पालिकेचे दुर्लक्ष

Baina Fish Market: वीजजोडणी तोडण्याचा वीज खात्याचा इशारा; पालिकेकडे निधीची कमतरता

गोमन्तक डिजिटल टीम

बायणातील मासळी मार्केटच्या दुरुस्तीकडे मुरगाव पालिका लक्ष देत नसल्याने मासे विक्रेत्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी तेथील खिडकीची मोडतोड करून एका व्यक्तीने एका मासे विक्रेत्याचे मासे चोरले तसेच मुरगाव पालिकेने गेल्या काही वर्षांचे वीज बिल फेडले नसल्याने तेथील वीजजोडणी तोडण्याचा इशारा वीज खात्याने दिला आहे.

बायणातील मासळी मार्केटची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. पूर्वी या मार्केटात भाजी तसेच मासळी विक्रेते व्यवसाय करीत होते. परंतु या मार्केटच्या दुरुस्तीकडे मुरगाव पालिका लक्ष देत नसल्याने काही भाजी विक्रेत्यांनी मार्केटच्या बाहेरील मुख्य रस्त्यावरच आपला व्यवसाय सुरू केला आहे.

या मार्केटात पूर्वी सुमारे वीसच्या आसपास मासे विक्रेत्या होत्या. परंतु आता तेथे फक्त तीनच मासे विक्रेत्या आहेत. इतरांनी रस्त्यावर आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याविरोधातही मुरगाव पालिका कोणतीही कारवाई करीत नाही.

त्यामुळे मार्केटातील विक्रेत्यांना ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे. मुरगाव पालिकेच्या एकंदर भूमिकेमुळे सदर मार्केट ओस पडले आहे. तसेच रस्त्याकडेला मासे, भाजी विकण्याची संख्या वाढली आहे.

पालिकेकडे निधीची कमतरता

येथे पाण्याचा नळ आहे; परंतु त्याला रात्रीच्यावेळी पाणी येत असल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे विक्रेत्यांना आसपासच्या भागातून पाणी आणावे लागते. आता वीज बिलाची थकबाकी मुरगाव पालिकेने फेडली नसल्याने वीजजोडणी तोडण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी वीज खात्याने दिला आहे. एक लाख वीस हजारांपेक्षा अधिक थकबाकी आहे. ती फेडण्यासाठी मुरगाव पालिकेकडे निधी नसल्याची माहिती मिळाली आहे.

चाेरीच्या घटनाही वाढल्या

या मार्केटच्या छपराची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात पाणी मार्केटात जमा होते. त्यामुळे विक्रेत्यांची तसेच ग्राहकांची गैरसोय होते. हे छप्पर दुरुस्त करण्यासंबंधी मुरगाव पालिकेला वारंवार विनंत्या करण्यात आल्या. परंतु पालिका त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. या छपराची पाहणी केली जाते; परंतु दुरुस्ती करण्याचे नाव घेतले जात नाही. तेथील खिडक्याही खिळखिळ्या झाल्याने रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती मार्केटात शिरून मासे चोरण्याच्या घटना सतत घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT