Ramesh Tawadkar on Disqualification Petition  Dainik Gomanak
गोवा

Ramesh Tawadkar: माझ्यासमोर वेळेची मर्यादा नाही; सध्या सर्वांच्या बाजू ऐकून घेतोय...

सभापती रमेश तवडकर; सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना फटकारले

Akshay Nirmale

Ramesh Tawadkar: शिवसेनेच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यावरून आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले.

सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांना दोन्ही पक्षांबाबतच्या याचिका कधीपर्यंत निकालात काढायच्या याची कालमर्यादाच घालून दिली आहे.

दरम्यान, यानंतर गोव्यातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. तसेच अशाच पद्धतीची याचिका गोव्याच्या विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे प्रलंबित आहे.

सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या निर्देशांवरून त्याबाबत गोव्यातील परिस्थितीबाबत रमेश तवडकरांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी मला वेळेची मर्यादा नाही, असे वक्तव्य केले आहे.

रमेश तवडकर म्हणाले की, आपल्याला कोणत्याही न्यायालयाने अपात्रता याचिकेसंदर्भात निर्णय घेण्यास वेळेची मर्यादा घातलेली नाही. माझ्यासमोर अपात्रता याचिका सादर झाल्या आहेत. त्यावर योग्य ती प्रक्रिया केली जात आहे.

घटनात्मक विश्लेषणाची गरज असलेली अशी प्रकरणे घाईने हाताळता येत नाहीत. यात मी जजचे काम करतो आहे. जज ज्याप्रमाणे सर्वांचे ऐकून घेतात. तसे मी सर्वांचे ऐकून घेत आहेत. सध्या मी सर्वांची बाजू ऐकून घेत आहे. माझ्यासमोर वेळेची मर्यादा नाही.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश दिले आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेंवरील निर्णय 31 जानेवारीपर्यंत द्यावा, असे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT