Speaker Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभेचे सभापती ठरले सायबर अटॅकचे शिकार, आमदारांना फोन करुन केली जातेय पैशांची मागणी

Goa Assembly Speaker Ramesh Tawadkar: सभापती रमेश तवडकरांनी याबाबत पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pramod Yadav

काणकोण: गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर सायबर अटॅकचे बळी ठरले आहेत. तवडकरांचा फेक आयडी आणि Whatsapp वर डिपीला फोटो वापरून फसवणूक केली जात आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील चाळीस आमदारांना फोन करुन पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार सभापती तवडकरांनी दाखल केलीय.

सभापती रमेश तवडकरांनी याबाबत काणकोण पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. माझा बनावट फेक आयडी तयार करुन तसेच, Whatsapp वरती डिपीला फोटो वापरुन बदनामी केली जात आहे. राज्यातील सर्व आमदारांना फोन करुन पैशांची मागणी केली जात आहे, असे तवडकरांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, मी कोणत्याही प्रकारे कोणत्याच आमदाराकडे पैसे मागितले नाहीत अथवा मला तशी गरज देखील नाही, असे तवडकरांनी स्पष्ट केले आहे.

सभापती रमेश तवडकरांनी याबाबत पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT