Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session : विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ

मार्शलनी आंदोलन करणाऱ्या विरोधकांना सभागृहाच्या बाहेर काढले.

आदित्य जोशी

Goa Assembly Session : विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर मार्शलनी आंदोलन करणाऱ्या विरोधकांना सभागृहाच्या बाहेर काढले. आज हातात सेव्ह म्हादई सेव्ह गोवाचे बॅनर घेत विरोधक वेलमध्ये आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

म्हादई प्रश्नासह अन्य मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले असून आजपासून सुरु होणाऱ्या चार दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल रविवारी काँग्रेसचे युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्ता, ‘आप’चे वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा तसेच गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांची मडगाव येथे बैठक झाली. त्यात म्हादई प्रश्नावर सरकारला घेरण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती.

आज सोमवारी दुपारी 4 वाजता विर्डी साखळी येथे होणाऱ्या म्हादई बचाव महासभेला सासष्टीतून जास्तीत जास्त लोक आणण्याची तयारीही या बैठकीत करण्यात आली. आजची बैठक आणि चार दिवसांचे अधिवेशन यात सर्वांनी कोणकोणती भूमिका निभावायची यावर विरोधकांची चर्चा झाली, अशी माहिती वेंझी व्हिएगस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT