Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: सरकराला 600 प्रश्नांचा करावा लागणार सामना

शून्य तासाचे सात विषय, चार लक्षवेधी सूचना, तिसेक सरकारी विधेयके, अर्थसंकल्पावरील सारी चर्चा या साऱ्याचा सामना गोवा सरकारला आज करावा लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: विविध मुद्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असतानाच विधिमंडळातील (Assembly) परीक्षेस सरकारला सामोरे जावे लागत आहे. शून्य तासाचे सात विषय, चार लक्षवेधी सूचना, तिसेक सरकारी विधेयके, अर्थसंकल्पावरील (Budget) सारी चर्चा, सहाशे प्रश्न या साऱ्याचा सामना सरकारला (Goa Government) आज करावा लागणार आहे.

विधिमंडळ कामकाज नियमानुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा कामकाज संपवायचे असते. मात्र तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले म्हणून विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतच विरोधी आमदारांनी नाराजीचा सूर लेखी स्वरूपात व्यक्त केला होता. त्यामुळे सरकारी कामकाज आटोपण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विधानसभा कामकाज चालवणे भाग पडू शकते, अर्थात विरोधक कामकाजात सहभागी झाले तर, त्यांनी बहिष्कार टाकला तर सरकारला आपला मार्ग मोकळा झाल्यासारखे होईल.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ऑनलाईन अधिवेशन घ्या अशी मागणी केली आहे. राज्यातील सरकारी कार्यक्रम तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आले तेव्हा कोविड - 19 चे नियम लागू होत नाही का? राज्यातील गावे पुरामुळे पाण्याखाली गेली असताना तसेच अनेकांचे संसार उद्‍ध्वस्त झाले असताना त्यांच्या आगमनासाठी ढोल बडवण्यात आले अशी सडकून टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती. कोविडच्या नावाखाली अधिवेशनचे कामकाज कमी दिवसांचे का? अशी विचारणा त्यांनी केली.

ऑनलाईन शिक्षणाचा मुद्दा

ऑनलाईन शिक्षणावरून मगोचे नेते आक्रमक झाले आहेत. आमदार सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेच्या मागील अधिवेशनात सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याचे उत्तर सरकारला दिले नाही तर सभापतींसमोरील हौद्यात आपण धरणे धरू असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांना इतर विरोधी पक्ष आमदार, अपक्ष आमदारांची साथ मिळते का याचे उत्तरही मिळणार आहे.

खाण प्रश्नाकडे लक्ष

खाण महामंडळ स्थापन करून प्रश्न सोडवण्यावर सरकारचा भर आहे. महामंडळ स्थापन करण्यासाठीचे विधेयक या विधानसभा अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे. त्या मुद्यावरून सरकारला विरोधक घेरतात की खाणी सुरू व्हाव्यात या मुद्यावर सरकारला पाठिंबा देतात हेही विधानसभा अधिवेशनात स्पष्ट होईल.

घरांना क्रमांक

गावागावातील बेकायदा घरांना क्रमांक देऊन कर वसुली करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. त्यासाठीचे विधेयकही सरकार आणणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही सरकारी खेळी विरोधक कशी रोखणार यावर विरोधकांचा कस लागणार आहे कारण ते याला विरोध केला तर लोकांच्या नजरेत विरोधी पक्ष खलनायक ठरू शकतात.

पूरग्रस्तांच्या मदतीचा विषय गाजणार

पुराने राज्याच्या पूर्व भागात जबरदस्त तडाखा बसला आहे. सरकारला विधिमंडळात घेरण्यासाठी पाच आमदार असलेली कॉंग्रेस आणि तीन आमदार असलेला गोवा फॉरवर्ड एकत्र येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्या जोडीला सरकारपक्षापासून फारकत घेतलेले अपक्ष आमदार प्रसाद गावकर, पर्वरीतील दोन पंचायती भाजपने आपल्याकडे खेचल्याने आमदार रोहन खंवटे यांचेही आक्रमक रूप या विधानसभा अधिवेशनात पहावयास मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT