कामकाज मंत्री माविन गुदिन्हो (Minister of Labor Mavin Gudinho) यांच्या विधानावरून विरोधी आमदार आक्रमक झाले. Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: विरोधी आमदार विधानसभेत नाटके करण्यासाठी येतात

कामकाज मंत्री माविन गुदिन्हो (Minister of Labor Mavin Gudinho) यांच्या विधानावरून विरोधी आमदार आक्रमक झाले. त्यांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली.

दैनिक गोमन्तक

पणजी: विरोधी आमदार (Opposition MLAs in Goa) विधानसभेत नाटके करण्यासाठी येतात (Come to the Legislature to do plays) या विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो (Minister of Labor Mavin Gudinho) यांच्या विधानावरून विरोधी आमदार आक्रमक (Opposition MLAs aggressive) झाले. त्यांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली. यामुळे सभापतींना विधानसभेच्या कामकाजाची वेळ वाढवलेली असतानाही कामकाज तहकूब करावे लागले.

विधानसभेमध्ये अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होऊन अर्थसंकल्प मंजूर झालाच नाही तर मग आता या अधिवेशनामध्ये खातेनिहाय मागण्यांवर कशी चर्चा करता व मतदान करता येईल अशी विचारणा करत विरोधकांनी विधानसभेत सरकारची कोंडी केली.

विधानसभेच्या महाराष्ट्र मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी अर्थसंकल्प सर्वसाधारण चर्चा सुरू झाली होती मात्र त्यानंतर ते अधिवेशन बेमुदत काळासाठी तहकूब करण्यात आले होते. सरकारच्या शिफारशीवरून राज्यपालांनी यानंतर अधिवेशन संपवले होते. त्याचा आधार घेत सरकारने आज हे नवीन अधिवेशन आहे, त्यामुळे मागील अधिवेशनातील कामकाजाचा आजच्या कामकाजाशी संबंध नाही अशी‌‌ भुमिका घेतली‌. त्यामुळे अर्थसंकल्पावर त्यावेळी अर्धवट राहील अशी चर्चा आता च्या अधिवेशनात परी करता येणार नाहीत असे सरकारचे म्हणणे होते.

चला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मडकई येथे आमदार सुदिन ढवळीकर, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी याला आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर द्यायचे नाही तर त्यांनी विधानसभेत असे स्पष्ट सांगावे असे विरोधी आमदारांनी बजावले.

विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो विधानसभा कामकाज विषयक नियम निलंबित केल्याकडे लक्ष वेधले. सभापती राजेश पाटणेकर यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत असा निर्णय झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असता विरोधी आमदारांनी आमची त्याला सहमती नव्हती असे सांगितले. याच दरम्यान गुदिन्हो यांनी ही शेरेबाजी केल्याने विरोधी आमदार आक्रमक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT