CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: बांधकाम व्यावसायिकांना दिलासा! वाळू उपश्याबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती, उपसा पुन्हा सुरू होणार...

Goa Assembly: गोव्यातील जनतेला वाळूचा पुरवठा मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Assembly: राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या अहवालानुसार मांडवी, जुवारी, शापोरा या नद्यांच्या पात्रातून वाळू उपसा सुरू करण्यात येणार आहे.

त्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड महिना लागणार असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणारी कायदेशीर वाळू तशीच चालू ठेवली जाईल.

जेणेकरून वाळूचे दर नियंत्रणात राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहाला दिली.

गोव्यातील जनतेला वाळूचा पुरवठा मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पूर्वी राज्यात पारंपरिक पद्धतीने रेती उपसा केला जायचा त्यावेळी त्याचा परिणाम पर्यावणावर होत नव्हता.

पण, कालांतराने पंप लावून पाणी उपसून नंतर वाळू काढण्याची अशास्त्रीय पद्धत सुरू झाली. यामुळेच गोव्यातील वाळू उपसा ठप्प झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ग्राहकांची वाळूची मागणी-

वाळूची गरज लक्षात घेऊन वाळू उपसा सुरू करण्यासाठी सरकारने लगेच राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेला अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संस्थेने मांडवी, जुवारी व शापोरा या नद्यांतून पारंपरिक पद्धतीने रेती उपसा करता येईल.

असा अहवाल दिला आहे. आता दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या नद्यांमधून रितसर रेती उपसा करता यावा, यासाठी पर्यावरण खात्याकडे अर्ज केला आहे. साधारण दीड महिन्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर राज्यात कायदेशीर रेती उपसा सुरू होईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले. पुढील दोन महिन्यांत काही नद्यांतील गाळ उपसला जाणार आहे. यातील रेती पुरवठादारांना सरकारकडून विकली जाईल. यामुळे पुढील दोन महिने रेतीचे दर स्थिर राहतील, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT