Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली पहिल्या प्रेमाची कबुली; म्हणाले...

सोशल मीडियातून दिली माहिती

गोमंतक ऑनलाईन टीम

Yuri Alemao: पहिले प्रेम प्रत्येकासाठी खास असते. पहिल्या प्रेमाचे प्रत्येकाला आकर्षण असते. याला राजकीय नेते तरी कसे अपवाद असतील? गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी देखील त्यांच्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

आलेमाव यांनी बुधवारी सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे. अर्थात हे प्रेम वेगळं प्रेम आहे. खरं तर, आलेमाव यांचे हे पहिले प्रेम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्यांची आवड आहे. बुधवारी जागतिक पायलट दिनाचे औचित्य साधून आलेमाव यांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी त्यांचा जुना फोटो शेअर केला आहेत. एका फोटोत ते एका विमानासमोर उभे असलेले दिसतात. तर दुसऱ्या फोटोत ते विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेले दिसतात.

आलेमाव यांनी या ट्वटिमध्ये म्हटले आहे की, उड्डाण व्यवसायात असलेल्या सर्वांना पायलट दिनाच्या शुभेच्छा. विमान उडवणे हेच माझे पहिले प्रेम आहे. जमिन सोडून नवनवी क्षितिजे पादाक्रांत करण्याचे धाडस बाळगणाऱ्या आणि त्याची पुर्तता करणाऱ्यांना शुभेच्छा. स्वतःला आव्हाने देत राहा, मोठे ध्येय ठेवा, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT