CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती; राज्याबाहेरील वाहनांना लागू होणार...

खनिज डंप धोरण महिनाभरात करणार जाहीर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session : राज्याबाहेरील वाहनांसाठी आता हरित कर (ग्रीन सेस) लागू होणार आहे. नऊ खनिज ब्लॉकचे लिलाव झालेले आहेत. खनिज डंप धोरण येत्या महिन्याभरात जाहीर होईल. त्याशिवाय 2023-24 च्या 24 हजार 844 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातील 23 टक्के म्हणजे 5 हजार 450 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अर्थसंकल्पावरील विरोधकांच्या प्रश्‍नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ते म्हणाले, राज्यात परराज्यातून लाखो वाहने पर्यटनासाठी येतात. त्या वाहनांना हरित कर लावला जाईल.

त्या करातून जमा होणारी रक्कम पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल. त्याशिवाय कदंब परिवहन महामंडळातर्फे खासगी बसधारकांसाठी राबविली जाणारी ‘माझी बस’ योजना या महिन्यात सुरू होईल. त्याचबरोबर खाण डंप धोरण महिनाभरात जाहीर होईल.

दयानंद सामाजिक स्वास्थ्य योजना, गृहआधार आणि लाडली लक्ष्मी योजनेची रक्कम लाभार्थींच्या खात्यावर लवकर टाकण्याची सूचना केली आहे. लाडली लक्ष्मीचे सात कोटी रुपये पडून आहेत.

आमदार मायकल लोबो यांनी वाहतूक पोलिस पर्यटकांची वाहने अडवून कारवाई करतात, असे म्हटले होते. परंतु वाहतूक पोलिसांच्या अधिकारावर बंदी येणार नाही, पण त्यांना विशेष सूचना केल्या जातील, असे सावंत म्हणाले.

वित्त आयोगाचे केले विशेष कौतुक

राज्य वित्त आयोगाने चांगल्या रितीने काम केले आहे. १४ व्या १५ वित्त आयोगाची रक्कम ग्रामपंचायत, नगरपालिका आणि जिल्हास्तरावर कशी उपयोगात आणायची, हे त्यांनी कार्यशाळा घेऊन सांगितले. त्यामुळे त्यांचा ९२ टक्के निधी वापरात आला.

यावेळी वित्त आयोगाचे अधिकारी दौलत हवालदार, दुर्गाप्रसाद आणि गुरुनाथ पोतेकर यांच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी विशेष करून गौरव केला.

लक्षवेधी घोषणा

  • दर तीन महिन्यांनी ‘नवे पर्व’ ही पुस्तिका प्रसिद्ध करून सरकारच्या कामांची माहिती त्यात देणार.

  • रस्ते आणि पाणी पुरवठ्यांची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू करणार.

  • सरकारी खात्यांमधील कॅन्टिन स्वयंसाह्य गटांना चालविण्यासाठी देण्याचा सरकारचा निर्णय.

  • ज्या घरात वयोवृद्ध पती-पत्नी राहतात, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री मातृ-पितृ कल्याण केंद्र सुरू करणार.

  • नव्या शिक्षण धोरणानुसार २०५ संस्थांनी केली नोंदणी.

  • २०२४ पर्यंत सर्वांना किमान दोन तास स्वच्छ पिण्याचे पाणी नळाद्वारे देणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

Horoscope: अडीच वर्षांनी शनिदेव सोडणार जागा, 2026 करणार मोठा न्याय! 'या' 3 राशी होणार मालामाल; करिअरमध्ये भरारी निश्चित

Drug Trafficking: गोळीबारात 64 हून अधिक ठार, 81 संशयितांना अटक, 42 रायफल्स जप्त; अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई!

Goa Sand Mafia Raj: गोव्यातील गोळीबाराची देशात चर्चा; 'एक्स'वर वाळू माफिया राज हॅशटॅग ट्रेन्डिंग

'तूफ़ान समुंदर के न दरिया के भँवर देख'! 19 तास, 94 किलोमीटर अंतर! प्रतिकूल हवामानात 'आर्यन'ने पार केला गोव्याचा समुद्र

SCROLL FOR NEXT