Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2025: गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, जुलैमध्ये 'या' दिवसांपासून सुरु होणार

Goa State Assembly Monsoon Session 2025: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वादावर बोलताना गोमेकॉतील डॉक्टरांचा विषय संपल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

Pramod Yadav

पणजी: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात (२२ जुलै) पासून सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आज (११ जून) निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोवा वारसा धोरणाला देखील मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यांशी संवाद साधला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोवा राज्य वारसा धोरणाला मान्यता देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै पासून सुरु होणार असल्याची माहिती मुख्यंमंत्र्यांनी दिली. अधिवेशनाचा कालावधी किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय चिंबल येथे होणाऱ्या युनिटी मॉलसाठी निविदा जारी करण्यात आल्याचे सावंत म्हणाले.

मंत्रिमंडळातील इतर महत्वाचे निर्णय

- वाघेरी, सत्तरीत मोबाईल टॉवरसाठी 200 स्क्वेअर मीटर सरकारी जमीन मंजूर

- सांगेत मोबाईल टॉवरसाठी सरकारी जमीन देण्यास मंजुरी

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वादावर बोलताना गोमेकॉतील डॉक्टरांचा विषय संपल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. मी डॉक्टरांशी चर्चा करण्यापूर्वी आणि चर्चा झाल्यानंतरही आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंशी चर्चा केली, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. तसेच, सर्वांशी चर्चा करुन टॅक्सीवाल्यांचाही विषय सोडवणार, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT