Goa Assembly Monsoon Session 2024 Day 3 Live Update Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, शॉन इव्हेंट्समध्ये भ्रष्टाचार; सत्ताधारी विरोधकांत खडाजंगी, वाचा तिसऱ्या दिवशी काय घडलं

Goa legislative assembly monsoon session 2024: गोवा सरकारने १ हजार ४२३ तात्पुरती महसूल अधिक्य (Provisional Revenue Surplus) अर्थसंकल्प मांडला, असे मुख्यमंत्री सावंत त्यांच्या उत्तरात म्हणाले.

Pramod Yadav

महसूल अधिक्य (Revenue Surplus) अर्थसंकल्प!

गोवा सरकारने १ हजार ४२३ तात्पुरती महसूल अधिक्य (Provisional Revenue Surplus) अर्थसंकल्प मांडला आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी कर्जाची मर्यादा ४ हजार २०० कोटी असताना आम्ही फक्त २ हजार ६७ कोटींचे कर्ज घेतले आहे. १ एप्रिल ते आजपर्यंत एकाही रुपयाचे कर्ज घेतलेले नाही. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची विधानसभेत माहिती.

हाऊसिंग बोर्डऐवजी 'श्रमधाम' साठी आर्थिक तरतूद करा!

हाऊसिंग बोर्ड मार्फत ग्रामीण भागातील गरिबांना सवलतीच्या दरात फ्लॅट देणे शक्य नाही. त्याऐवजी सरकारने सभापती तवडकरांच्या 'श्रमधाम' योजनेसाठी आर्थिक तरतूद करावी. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंची विधानसभेत मागणी.

म्हादई वाचविण्यासाठी 'व्‍याघ्र प्रकल्‍प' अधिसूचित करा; विरोधी पक्षनेत्यांचे सत्ताधाऱ्यांवर ताशेरे

अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना विरोधी पक्षनेते युरी आमेमाव यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकत म्हादईवर देखील भाष्य केले. म्हादई वाचविण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी केली.

अर्थसंकल्पावर चर्चा, आपच्या आमदाराने केले सीएम सावंतांचे कौतुक

सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली असून, आपचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.

Goa Assembly Monsoon Session 2024 Day 3 Live Update: 'हर घर जल'च्या दाव्यावरुन सरकार विरोधकांकडून धारेवर!

सरकारचा 'हर घर जल'चा दावा खोटा. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची जोडणी देखील नाही. आमदार विजय, विरेश आणि फेरेरांकडून विधानसभेत संयुक्त लक्षवेधी. सरकारला धरले धारेवर.

पुढील २ ते ३ महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी धोरण!

राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या जटील. पुढील दोन ते तीन महिन्यात एनजीओ तसेच विरोधी आमदारांना विश्वासात घेऊन सरकार धोरण तयार करेल. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.

गोव्यात भटक्या कुत्र्यांची समस्या! आमोणकरांची लक्षवेधीवर आमदारांच्या सूचना

राज्यात भटक्या कुत्र्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे आमोणकरांनी मांडलेल्या समस्येत म्हटलंय. यावर विविध आमदारांनी सूचना केल्या असून, योग्य उपयायोजनांची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांनी देखीस त्रास होत असल्याचे आमदारांनी नमूद केले.

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आमदार आमोणकरांची लक्षवेधी

राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकरांनी लक्षवेधी मांडली आहे. जीत आरोलकर, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, चंद्रकांत शेट्ये यांनी मत आणि सूचना केल्या.

Road Show In Goa: गेल्या ४ वर्षात रोड शोवर ६३ कोटींचा खर्च!

गेल्या ४ वर्षांत पर्यटन खात्याकडून रोड शोजवर तब्बल ६३ कोटींचा खर्च. ६३ पैकी ३० कोटी भारतातील रोड शोवर तर ३३ कोटी आंतरराष्ट्रीय रोड शोजवर खर्च. विजय सरदेसाईंच्या प्रश्नावर पर्यटन खात्याचे लेखी उत्तर.

'शॉन इव्हेंट्स' बनलाय गोवा सरकारचा जावई!

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या प्रचारासाठी पर्यटन खात्याने चार कोटी खर्च केले. मुख्यमंत्र्यांनी अर्थ खात्याचा आदेश ओव्हर रुल करुन खर्चाला मान्यता दिली. 'शहाजहान' आणि यांचे हे जॉयंट व्हेंचर. 'शॉन इव्हेंट्स' बनलाय सरकारी जावई. विजय सरदेसाईंचा घणाघात.

मुळगावातील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे काम लवकर सुरु होणार

डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुळगाव येथे ठरलेल्या जागेतच लवकरात लवकर पशुवैद्यकीय रुग्णालय होणार असल्याचे उत्तर दिले.

मुळगाव येथे पशुवैद्यकीय रुग्णालय, चंद्रकांत शेट्ये यांचा प्रश्न

मुळगाव येथे पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी घेतलेली १७ हजार २८० चौरस जागा पडून. २०२० साली पायाभरणी केल्यानंतर काहीच झाले नाही. सरकार या रूग्णालयाबद्दल गंभीर आहे का असा तारांकित सवाल डिचोली चे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सभागृहात केला.

Goa Assembly Today Session Live Watch Here 

Ashadhi Ekadashi 2024: मुख्यमंत्र्यांकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

तिसऱ्या दिवशीचे काम सुरु होताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Goa Assembly Session Day 3: सभागृहात तिसऱ्या दिवशी काय होणार?

पहिल्या दोन दिवसांच्या प्रश्नोत्तराचा काळ माफीच्या मागणीवरुन वाया गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणत्या प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT