Salaulim Dam  
गोवा

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या साळावली आणि अंजुणे धरणाचे सौंदर्य वाढणार, मंत्री शिरोडकरांनी दिली माहिती

दोन्ही धरणे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतील व अधिक पर्यटकांना आकर्षित करतील यात शंका नाही.

Pramod Yadav

Salaulim Anjunem Dam प्रसिद्ध साळावली आणि अंजुणे धरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. पर्यटक आणि गोंयकारांसाठी आकर्षण असलेल्या या धरणांच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी विद्युत रोषणाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री सुभाष शिरोडकरांनी माहिती सभागृहात दिली आहे.

यामुळे दोन्ही धरणे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतील व अधिक पर्यटकांना आकर्षित करतील यात शंका नाही.

जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकरांनी यांनी मागण्या आणि कपात सत्रात उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सर्व मतदारसंघातील आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. तसेच, माझ्या खात्यात नाही हा शब्द सापडणार नाही, मागील 40 वर्षात मी कोणालाच नाही म्हटले नाही. असे शिरोडकरांनी स्पष्ट केले.

प्रत्येक मतदार संघात किंवा ग्रामपंचायत स्तरावर देखील जल संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्यास हरकत नाही. त्यासाठी नेहमीच समर्थन असल्याचे शिरोडकर म्हणाले.

दरम्यान, यावेळी मंत्री शिरोडकरांनी राज्यातील धरणे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. विशेषत: दक्षिणेतील साळावली धरणाला अनेक स्थानिक आणि पर्यटक भेट देत आहेत. दररोज हजार बाराशे लोक येथे जात आहेत.

या धरणांचे सौंदर्य वाढविण्यासाठी येत्या शनिवारी साळावली आणि अंजुणे धरणावर विद्युत रोषणाई करणार असल्याची माहिती मंत्री सुभाष शिरोडकरांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT