Mavin Gudinho 
गोवा

गोवा 2 लाखाहून अधिक वाहने स्क्रॅप करणार; वाहन घनतेच्या बाबतीत राज्य जगात 15 व्या स्थानी

वाहन स्क्रॅपिंग धोरणात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा सक्तीने समावेश करणे गरज असल्याचे माविन म्हणाले.

Pramod Yadav

Goa assembly monsoon session 2023: गोवा सरकार दोन लाखाहून अधिक वाहने स्क्रॅप करणार आहे. 15 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण 2,19,921 वाहनांची 15 वर्षापूर्वी नोंदणी झाली आहे. 31 डिसेंबर पर्यंत यात आणखी 15,425 वाहनांची वाढ होईल.

वाहन घनतेच्या बाबतीत गोवा जगात 15 व्या क्रमांकावर आहे. अशी माहिती वाहतूक आणि परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी विचारलेल्या प्रश्नाला वाहतूक आणि परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी उत्तर दिले. वाहन स्क्रॅपिंग धोरणात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा सक्तीने समावेश करणे गरज असल्याचे माविन म्हणाले.

या वर्षी गोव्यात 03 ऑगस्टपर्यंत 42,957 वाहनांची नोंदणी झालीय. गोव्यात दरडोई वाहन मालकी राष्ट्रीय सरासरीच्या 4.5 पट आहे. रस्त्यावरील जुनी प्रदूषक वाहने कमी करणे हा स्क्रॅपिंग धोरणाचा मुख्य उद्देश आहे. कार्बन उत्सर्जनासाठी वाहतूक क्षेत्राचे प्रमुख योगदान आहे. त्यामुळे स्क्रॅपिंग धोरण महत्वाचे असल्याचे माविन गुदिन्हो यांनी नमूद केले.

केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, राज्य परिवहन उपक्रम आणि स्वायत्त संस्था यांच्या मालकीची 15 वर्षे जुनी वाहने 1 एप्रिल 2023 पासून स्क्रॅप करणे सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र, राज्यात अद्याप वाहन स्क्रॅपिंगची सुविधा नाही.

तसेच, 4 एप्रिल 2023 पर्यंत नोंदणी झालेली 2,992 सरकारी वाहने राज्यात आहेत. त्यापैकी 521 सरकारी वाहनांची 15 वर्षे पूर्ण झाली आहेत.

आणखी पाच वाहनांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ही वाहने अजूनही वापरात आहेत की नाही, याबाबत परिवहन विभागाकडे कोणतीही माहिती नाही. असे माविन गुदिन्हो म्हणाले.

वाहने बदलण्यासाठी अंदाजे 95.9 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांत 898 नवीन सरकारी वाहनांची नोंदणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

VIDEO: जस्सी 'जैसा' कोई नही! क्विंटन डिकॉकला केलं चारीमुंड्या चित, धाकड गोलंदाजीनं केलं क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

सत्तरीत अवकाळी पावसाचा तडाखा! अचानक कोसळलेल्या सरींनी काजू उत्पादकांचे धाबे दणाणले; उत्पादन घटण्याची भीती

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

SCROLL FOR NEXT