Goa assembly monsoon session 2023 | Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: विधानसभेत प्रश्‍न मांडण्यास विरोधकांना यश, आता प्रतिक्रियांसाठी लोकांसमोर जाणार

अधिवेशनात सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Sardesai विधानसभेमध्ये विरोधी आमदारांचे संख्याबळ कमी असले, तरी सरकारचे अनेक घोटाळे आणि कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यास तसेच लोकांच्या अनेक समस्या, प्रश्‍न मांडण्यास विरोधकांना यश आले.

या सरकारने लोकांची दिशाभूल करून गोवा विक्रीस काढला आहे. चार वर्षानंतर 18 दिवसांच्या कार्यकाळ असलेले हे अधिवेशन असल्याने विरोधकांना लोकांचे प्रश्‍न मांडण्यास वेळ मिळाला, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, विधानसभेत मांडण्यात आलेल्या लोकांच्या समस्या व प्रश्‍नाबाबत ते समाधानी आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष लोकांसमोर जाणार आहे. त्यासंदर्भातचा कार्यक्रम लवकर जाहीर केला जाईल,

पक्षाची राज्य कार्यकारी समितीची बैठक पणजीतील पक्षाच्या कार्यालयात आमदार विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत सरचिटणीस प्रशांत नाईक व उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दीपक कळंगुटकर उपस्थित होते.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात माहिती देताना सरदेसाई म्हणाले, की विधानसभेमध्ये लोकांच्या समस्या व प्रश्‍न मांडण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता.

त्यांचे अधिकाधिक प्रश्‍न मांडण्यात होते. लोक पक्षाकडे प्रश्‍न व समस्या घेऊन आले. त्यांचे प्रश्‍न व समस्या मांडण्यात आल्या, त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे पक्ष जाईल.

या विधानसभेत दरदिवशी एक घोटाळा याप्रमाणे सुमारे १८ घोटाळे अधिवेशनात मांडण्यात आले. कला अकादमी घोटाळ्याने सुरू होऊन ‘खेलो इंडिया’ या विषयाने ते संपले. नागरीपुरवठा खात्यातील निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वितरण तसेच जमिनींचे रूपांतरण, आयटी प्रकरणे अशी अनेक प्रकरणे उघडकीस आणण्यात आली.

त्यावर सरकारला स्पष्टीकरण व उत्तरे देण्यास अपयश आले. कोणत्याही विचाराविना काही विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम गोव्यावर होणार आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढणे शक्य नाही.

विरोधकांनी सरकारविरोधात अधिवेशनात लढा दिला. आता लोकांच्या मदतीने कृती आराखडा तयार करून राज्यात पुन्हा लढा उभारण्यात येईल.

फॉरवर्ड पक्ष हा सासष्टी क्षेत्रापुरताच नाही, तर संपूर्ण गोव्यासाठी आहे. त्यामुळे येत्या बुधावर १६ ऑगस्टपासून पणजीतील पक्षाच्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून लोकांना भेटण्यासाठी उपस्थित आपण राहणार आहे. त्यांच्या समस्या व प्रश्‍न ऐकून घेणार आहे, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

SCROLL FOR NEXT