गोव्यात मोफत योजनांचा ट्रेंड Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात मोफत योजनांचा ट्रेंड

गोमंतकियांना खरच कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे का? निवडणूकीच्या तोंडावर फक्त आश्वावसनांची खैरत होणार?

Priyanka Deshmukh

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या (2022 Goa Legislative Assembly election) अनुषंगाने गोव्यात प्रचाराचा आणि आश्वासानांचा पुर आला आहे. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमिवर गावेकरांना सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांचा (free schemes) पाऊस पाडायला सुरवात झाली आहे. तर काही नेत्यांचा पक्षांतरांचा खेळ सुरू झाला आहे. पण जरी अनेक बड्या नेत्यांनी गोमंतकियांना (Goa) आश्वासन दिलेत, तरी त्यांचा कल कुणाकडे असणार हे तर येणारा काळच सांगेल.

राज्यात याच पार्श्वभूमिवर मोफत योजनांचा ट्रेंड सुरू झाला तो आपच्या अरविंद केजरीवाल यांच्या गोव्यात येण्याने. या आश्‍‍वासनावरच आपण येणारी विधानसभा निवडणूक जिंकू, असा बहुतेक आपचा समज झालेला दिसतो. आणि अशातच मुख्‍यमंत्र्यांनी मोफत पाण्‍याची घोषणा करून ‘बिजली का जवाब पानीसे’ असाच काहीसा किस्सा गोव्यात रंगला आहे.

दरम्यान गोवा फॉरवर्डने 12 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या 22 ऑगस्टपासून दौरा सुरू करण्यात येणार आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्यात. गोवा फॉरवर्ड पक्ष सत्तेवर आल्यास जनतेसाठी मोफत शिक्षण व आरोग्य, तसेच महिलांना संरक्षण दिले जाईल, अशी माहिती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी दिली.

दरम्यान राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध पक्षांकडून आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. त्यातच ‘जनसंपर्क यात्रे’ वर असलेल्या भाजप सरकारनेही गोमंतकीयांची मने जिंकण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’ करण्याचे ठरविले आहे. राज्यातील नागरिकांना अत्यल्प दरात (काही युनिट मोफत) पाणी देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला. आता गोवेकरांना दर महिन्याला सोळा हजार घनलिटर पाणी मोफत दिले जाणार असल्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केली.

त्यातच मागील महिन्यात आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गोव्याला भेट दिली. आणि तेथूच गोव्यात मोफत योजनांचा ट्रेंड सुरू झाला. गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन गोव्यात आपली राजकीय पकड निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाने चांगलीच मेहनत सुरु केली असल्याचे पहायला मिळाले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर असतांना, गोव्यात आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास गोवेकरांना 24 तास मोफत वीज देण्याची गॅरंटी पणजीत दिली होती. आता यावरून, गोव्यात सध्या राजकीय नेत्यांनी मोफत ट्रेंड सुरू केला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान काल पणजीतील पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेत ‘आप’ने मोफत वीज देण्याचे जाहीर केल्यावर भाजपने मोफत पाणी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या पाण्यासाठी वार्षिक होणारा खर्च याचा विचार केला आहे का, असा प्रश्‍न कांदोळकर म्हणाले त्यांनी केला.

मोफत पाणी देण्यासाठी जो खर्च होणार आहे, तो गोमंतकीयांच्या खिशातूनच कर रूपाने वसूल केला जाणार आहे. त्यामुळे फुकट पाणी देण्यापेक्षा लोकांना 24 तास पाणी द्यावे. ही सर्व निवडणुकीच्या निमित्ताने आमिषे दाखविली जात आहेत, अशी टीका कांदोळकर यांनी केली.

आता या मोफत ट्रेंट वरून कोण कुणावर आणि कसा निशाणा साधणार हे बघायची उत्सुकता गोवेकरांना नक्कीच असणार आहे. कारण गोव्यात निवडणूकिचे वारे वहायला लागले आणि आश्वासनाचेही. तेव्हा गोमंतकियांना खरच कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे का? निवडणूकीच्या तोंडावर फक्त आश्वावसनांची खैरत होणार आहे हे येणारा काळच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT