Goa Assembly Monsoon Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: बीबीसीच्या ‘त्या’ डॉक्युमेंट्रीचे पडसाद; मुख्यमंत्री म्हणाले, डॉक्युमेंट्रीमुळे काही फरक पडणार नाही कारण...

बंदी घालण्याची विधानसभेत मागणी : गदारोळात ठराव मंजूर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session ‘बीबीसी’ या चॅनलने २००२ मध्ये घडलेल्या घटनेची डॉक्युमेंट्री काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीबद्दल बीबीसीवर बंदीची गरज असून येथे मंजूर झालेला ठराव केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

आमदार दाजी साळकर म्हणाले, २० वर्षांपूर्वी घडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील विषयावर बीबीसीने (ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कार्पोरेशन) डॉक्युमेंट्री काढली.

त्यावर कारवाई करावी, अशा मागणीचा ठराव त्यांनी मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जागतिक स्तरावर उच्चस्थानी पोहोचली आहे.

त्यामुळे डॉक्युमेंट्रीमुळे काही फरक पडणार नाही. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने आणलेल्या आणीबाणीची आठवण करून दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांवरही बंदी घातली होती.

काँग्रेस सोडून इतर सर्व नेत्यांना दोन वर्षे तुरुंगात टाकले होते, तेव्हा हा चौथा स्तंभ आणि बीबीसी कुठे होती. व्यक्ती प्रथम नव्हे, तर देश प्रथम आहे. अखेर गदारोळातच विधानसभेत हा ठराव मंजूर झाला.

प्रसार माध्यमांना दोष नको : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, बीबीसीने काढलेली डॉक्युमेंट्री ही जानेवारी महिन्यातील आहे. आता तिच्यावर बंदी आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही हा ठराव आणला, त्यामुळे लोक ती औत्सुक्याने पाहतील.

आम्ही जेव्हा भाजपसोबत गेलो, तेव्हा आमच्यावर तियात्रही काढले होते, नको तेवढी टीका आमच्यावर झाली होती. प्रसार माध्यमे आपली भूमिका पार पाडत आहेत. त्यांना दोष देऊन चालणार नाही. सप्टेंबर महिन्यात याप्रकरणी सुनावणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT