वर्षपद्धतीप्रमाणे श्री महालक्ष्मी देवीची काढण्यात आलेली मिरवणूक Dainik Gomantak
गोवा

मुरगाव हिंदू समाजातर्फे 'श्री महालक्ष्मी देवी'ची वार्षिक मिरवणूक

मुरगाव हिंदू समाज महालक्ष्मी उत्सव समिती 2021 वर्षपद्धतीप्रमाणे साजरा करण्यात येणार

Dainik Gomantak

Goa: राज्यात आज गुरुवारपासून दिव्यांचा सण दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपोत्सवाचे स्वागत गोमंतकीयांनी मोठ्या उत्साहात केले. घराघरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घराच्या समोर उंच जागी लावलेले आकाशकंदील आणि घर परिसरात लावलेल्या पणत्यांनी परिसर उजळून निघाला.संध्याकाळी श्री महालक्ष्मी पूजन (Mahalaxmi Pooja) करण्यात आले.

यंदा दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन आलेले आहे. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी 06.02 ते 08.34 या लक्ष्मी पुजनाच्या लाभदायक मुहुर्तावर घराघरांत, दुकानात आणि कार्यालयात लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजन वैभवी-श्रीमंती थाटाने केले गेले.काही ठिकाणी सुवर्ण मुद्रा, सोन्या चांदीचे, हिरे-माणिक रत्नांचे दागिने चौरंगावर सुशोभित, भरजरी भारी वस्त्राने वेष्ठित आसनावर तांदूळ, त्यावर पुष्प पसरून फुलांचे वा तांदळाचे कमळ काढून या कमला महालक्ष्मीचे थाटात उत्साहाने पूजन करण्यात आले. एकूणचं, हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीचा आनंद सर्वधर्मीय एकमेकांना विविध माध्यमातून वाटताना दिसत असून, एकूणच सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान मुरगाव हिंदू समाज महालक्ष्मी उत्सव समिती 2021 वर्षपद्धतीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी पूजन उत्सव यंदा गुरुवार 04/11/2021 ते शनिवार दि. 07/11/2021 पर्यंत खालील कार्यक्रमानुसार श्री महालक्ष्मी उत्सव मंडप धर्मशाळा मुरगाव येथे धुमधडाक्यात साजरा होणार आहे. त्यानुसार आज वर्षपद्धतीप्रमाणे श्री महालक्ष्मी देवीची मिरवणूक श्री महालक्ष्मी उत्सव मंडप धर्मशाळा येथून काढण्यात आली. सदर मिरवणूक एफ एल गोम्स मार्गे हिरालाल, स्वातंत्र्य पथ मार्गे महाराजा हाॅटेल समोरुन परत एफ एल गोम्स मार्गे खारीवाडा येथे श्री महालक्ष्मी उत्सव मंडप सांगता करण्यात आली. नंतर आरती तीर्थप्रसाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT