water tanker  Dainik Gomantak
गोवा

नळ कोरडे; गोव्यात ‘मोफत’ पाणी पुरवठ्याची घोषणा नावालाच!

पाण्याविना जनतेचे हाल: मांद्रे मतदारसंघात तीव्र पाणीटंचाई

दैनिक गोमन्तक

मोरजी: सरकारने मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा केली आहे. पण पंधरा-पंधरा दिवस नळांना पाण्याचा थेंबच येत नाही, त्यामुळे मोफत पाण्याची घोषणा नावालाच असल्याचा संताप पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदारसंघातील जनतेतून व्यक्त केला जात आहे.

सरकारने सध्या प्रत्येक नागरिकाला सोळा हजार लिटर मोफत पाणी देण्याची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण पेडणे तालुक्यातील ग्रामीण भागात फेरफटका मारला असता नळांना पंधरा, पंधरा दिवस पाणीच येत नाही, असे दिसून आले. नळांना पाणीच नसेल तर त्या नागरिकांना सोळा हजार लिटर पाणी तरी कसे मिळेल, असा सवाल केला जात आहे.

सरकार एका बाजूने मोफत पाणी देण्याची घोषणा करते, तर दुसऱ्या बाजूने नळाला पाणीच येत नाही. मग या योजनेचा लाभ कुणाला आणि कसा मिळेल? याचा खुलासा सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाने करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

परंतु पेडणे तालुक्यातील मांद्रे ,मोरजी,आगरवाडा, पार्से, तुये, पालये या भागात चार तास काय, तर पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे मंत्र्यांचे विधान चुकीचे असल्याची प्रतिक्रिया या भागातून व्यक्त करण्यात येत आहे.

पेडणे तालुक्यासाठीचा चांदेल पाणी प्रकल्प १५ एमएलडी चा असून तो बेभरवशाचा ठरत आहे. त्या प्रकल्पातून अभियंते आणि स्थानिक कर्मचारी मनमानी पध्दतीने ठराविक वाड्यांना, गावांना पाणी पुरवठा करत आहेत. वेळोवेळी जलवाहिनीचे व्हॉल्व बदलत असतात. त्यामुळे लोकांना पाणी व्यवस्थित मिळत नाही,असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. किमान दोन तास तरी नियमित पाणी आले तरी ते साठवून ठेवू शकतो. परंतु पंधरा दिवस महिना-महिना नळाचा पत्ताच नसल्याने आम्ही कुणाकडे दाद मागावी, अशी विचारणा ग्रामस्थांतून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT