Anjuna Illegal Construction: Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: सोमवारी हणजूण बंद! कारवाईविरोधात व्यावसायिक एकवटले

Anjuna Illegal Construction:सोमवारी शांततापूर्ण आंदोलन करणार

Ganeshprasad Gogate

Anjuna Illegal Construction: उद्या सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी हणजूण काय- सुआ पंचायतीतील सर्व आस्थापनांच्या मालकांनी, व्यावसायिकांनी आपापले बिझनेस बंद ठेवण्याचे ठरवले असून याच संदर्भांत आज रविवारी स्थानिक आणि येथील रेस्टॉरंट्स मालकांनी एकत्र येत हि माहिती पत्रकरांपर्यंत पोहोचवली.

उच्च न्यायालयाने हणजूणमधील CRZ क्षेत्रातील अतिक्रमण केलेली आस्थापने पाडण्याचे आदेश दिले होते. पंचायतीने या निर्णयाला पाठिंबा देत ही कारवाई सुरुही केली होती.

या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर याच निर्णयाविरोधात आज रविवारी येथील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत उद्या म्हणजेच सोमवारी हणजूणमधील सर्व आस्थापने बंद ठेवत स्टारको जंक्शन येथे शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा पूर्ण गावाचा विषय असून आमच्या बंदमध्ये हणजूण मधील हॉटेल्स व्यावसायिक, पब बार यांच्यासह वॉटर स्पोर्ट, रेंट कार या सर्व व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 175 रेस्टॉरंट्स बंद करणे आणि पाडणे या प्रकारामुळे रेस्टॉरंट्स मालक आर्थिक विवंचनेत सापडले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमची उपजीविका या व्यवसायावर असून हे व्यवसाय आम्हाला कोणतीही पूर्व कल्पना न देता बंद करणे आणि पडून टाकणे हा आमच्या पोटावर लाथ मारण्यासारखा प्रकार आहे.

आमचा उद्याचा बंद हा यशस्वी होणार असून या बंदच्या माध्यमातून आमचा आवाज आम्ही सरकार पर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सीआरझेड समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्वरीत आणि निर्णायक कारवाई करण्याची विनंती ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केली असून याच संदर्भात उद्या सोमवारी हणजूण बंदची हाक देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT