Anjuna News Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: आस्थापनांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरूच; सोमवारी हणजूण-वागातोरमधील 18 बेकायदेशीर बांधकामे सील

Anjuna News: तीन दिवसांपूर्वी हणजूणमधील अनिल मडगावकर यांच्या मालकीच्या ले गाला रिसॉर्टमधील बेकायदा बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले होते.

Ganeshprasad Gogate

Anjuna News: हणजूण- वागातोरच्या किनारी भागात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली बांधकामे पाडण्याचे, सील करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्यानंतर अशी बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हणजूण पंचायत क्षेत्रातील किनाऱ्यावरील विकास प्रतिबंधित तसेच सीआरझेड परिसरातील बेकायदा 175 बांधकामे सील करण्याचे निर्देश खंडपीठाने दिल्यानंतर स्थानिक पंचायत व गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सोमवारी हणजूण-वागातोर परिसरातील 18 बेकायदेशीर बांधकामे सील करण्यात अली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत मंडळ, उत्तर गोवा बीडीओ आणि हणजूण पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय. आतापर्यंत एकूण 43 बांधकामे सील करण्यात आली आहेत.

तीन दिवसांपूर्वी हणजूणमधील अनिल मडगावकर यांच्या मालकीच्या ले गाला रिसॉर्टमधील बेकायदा बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले होते.

बांधकाम नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी या रिसॉर्टवर अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आली होती.

विनापरवाना व्यवसाय

न्यायालयात सुनावणीवेळी तब्बल 175 आस्थापनांनी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून रितसर परवानगी न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले होते.

त्यामुळे या आस्थापनांसह बांधकामांना तात्काळ टाळे ठोकण्याचे निर्देश न्यायालयाने हणजूण पंचायत तसेच गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT