Goa And Konkan Today's Live News Update | Amit Palekar
Goa And Konkan Today's Live News Update | Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Goa And Konkan Today's News Update: दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Pramod Yadav

ईडीचे 'आप'च्या अमित पालेकर यांच्यासह तिघांना समन्स

अंमलबजावणी संचालनालयाचे आप गोवा संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांना समन्स. गुरुवारी (28 मार्च) ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश.

न्यायाधीश करणार पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी

Panaji Smart City

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामाची स्वत: पाहणी करणार. स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या प्रदुषणाविरोधात पणजीतील जागृत नागरिकांनी उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या आहेत.

सांगोल्डा पंचायतीत 16.10 लाखांचा घोटाळा; उपसरपंच मोरजकरांची हकालपट्टी

सांगोल्डा पंचायतीत 16.10 लाखांचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याने उपसरपंच उल्हास मोरजकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पंचायत संचालनालयाने त्यांना उपसरपंच पदावरून हटवण्याचा आदेश दिला आहे.

बाणावली खून प्रकरण; पत्नीला अटक

Benaulim Murder Case

बाणावली येथे विश्वनाथ सिधनल यांच्या हत्येप्रकरणी पत्नी वैष्णवी सिधनलला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, अधिक तपास सुरु आहे.

दीड महिन्‍याच्‍या बालिकेला उघड्यावर टाकून देणार्‍या आईला अटक

एका दीड महिन्‍याच्‍या बालिकेला तिच्‍याच आईने उघड्यावर टाकून दिल्‍याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी प्रियांका फर्नांडिस (३०, चंदगड-महाराष्‍ट्र) हिला अटक केली आहे. या महिलेने स्‍वत:च्‍याच मुलीला असे उघड्यावर का टाकून दिले याचे कारण मात्र स्‍पष्‍ट झालेले नाही.

Goa Police

पल्लवी धेंपे यांचे दक्षिणेत महिलांकडून भव्य स्वागत

भाजपच्या लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांचे वास्को येथे महिलांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

Pallavi Dempo

कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या चार बैलांची असोल्डा येथे सुटका

Assolda Quepem

कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या चार बैलांची सुटका. असोल्डा, केपे येथे स्थानिकांनी वाहन रोखल्यानंतर पोलिसांची कारवाई. मोहम्मद सादिक आणि लियाखत बेपारी (चांदर) यांना पोलिसांकडून अटक, वाहनही ताब्यात. पुढील तपास सुरू आहे.

Assolda Quepem

गोव्याची पॅरा अ‍ॅथलीट साक्षीला सुवर्णासह तीन पदके

Goa Para Athlete

गोव्याची पॅरा अ‍ॅथलीट साक्षी काळे हिने सहाव्या भारतीय खुल्या पॅरा अ‍ॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णासह एकूण तीन पदके जिंकली.

स्पर्धा बंगळूरमधील श्री कांतीरवा स्टेडियम संकुलात झाली. तिने टी-१२ (अंधत्व) प्रकारात लांबउडीत सुवर्ण, १०० मीटर शर्यतीत रौप्य, तर २०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

Goa Para Athlete Sakshi Kale

महानगरपालिकेत महिला नगरसेवकांना डावलले

Panaji Muncipal Corporation

महानरपालिकेत भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी गटाच्या ११ महिला नगरसेवक आहेत. परंतु त्यांना महापौरपद किंवा उपमहापौरपद देण्यात भाजपला स्वारस्य वाटत नाही. एका बाजूला लोकसभेची दक्षिणेत महिला उमेदवार देऊन भाजपकडून ५० टक्के आरक्षण दिल्याचा ढोल वाजवला जात आहे.

परंतु महानगरपालिकेत १२ महिला नगरसेवक आहेत. त्यापैकी ११ महिला नगरसेवक सत्ताधारी गटाच्या आहेत. या महिलांमध्ये एकही महिला महापौरपदासाठी पात्र नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बोर्डा-फातोर्डा येथे आढळले प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले दीड महिन्याचे बाळ

Borda fatorda

बोर्डा-फातोर्डा येथे आढळले प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले दीड महिन्याचे बाळ. चौकशीसाठी बाळाच्या पालक पोलिसांच्या ताब्यात. वैद्यकीय तपासणीसाठी बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. पोलिस अधिक तपास करतायेत.

पणजी महापौरपदी रोहित मोन्सेरात बिनविरोध

Panaji Muncipal Corporation

पणजी महानगरपालिकेचे महापौर म्हणून रोहित बाबूश मोन्सेरात आणि उपमहापौर म्हणून संजीव नाईक यांची बिनविरोध निवड. पणजी महानगरपालिकेत आज पार पडली निवडणूक

Rohit Monserrate

नेपाळमधील महापौरांची गोव्यात बेपत्ता झालेली कन्या अखेर सापडली

नेपाळमधील धानगाधीचे महापौर यांची कन्या आरती गोपाळ हमाल (३६) गोव्यातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, आरती रात्रीच्या सुमारास शिवोलीत सापडली असून, सुखरुप आहे. आरती हरमल येथे ओशोच्या धान्यधारणा शिबिरात सहभागी होण्यासाठी आली आहे.

Aarti Hamal

गोव्यातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

Goa Congress Loksabha Candidate

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, ॲड. रमाकांत खलप आणि विजय भिके दिल्लीला रवाना. पक्षश्रेष्ठींकडून पाचारण. आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. सायंकाळपर्यंत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.

Amit Patkar

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

Goa Todays Live Update: कोर्टाचा सख्त आदेश; घरमालकांनीच मोडली बेकायदेशीर घरे

SCROLL FOR NEXT