Goa ambulance shortage, Dainik Gomantak
गोवा

Goa Ambulance: गोव्यात 108 ची कमतरता; 'तातडीने वैद्यकीय मदत कशी मिळवावी?' स्थानिक चिंतातुर!

Ambulance Shortage Goa: म्हापसा जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकांची कमतरता आहे, त्यात ही घटना घडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे

Akshata Chhatre

शिवोली: म्हापसा शहरात शनिवार (दि. १५ फेब्रुवारी) संध्याकाळपासून 108 क्रमांकाची अत्यावश्यक रुग्णवाहिका बंद पडली आहे. म्हापसा-शिवोली गृहनिर्माण मंडळाच्या रस्त्यावर ही रुग्णवाहिका नादुरुस्त झाली असून, अद्याप तिची दुरुस्ती करण्यात आलेली नाही आणि यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. याआधीच म्हापसा जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकांची कमतरता आहे, त्यात ही घटना घडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

एखाद्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत कशी मिळवायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रुग्णवाहिका दुरुस्त करण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून रुग्णवाहिका सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवण्यात हलगर्जीपणा झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

म्हापसा जिल्हा रुग्नालयात रुग्णवाहिकेची कमतरता भासत आहे, तसेच या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्नावाहिका नादुरुस्त अवस्थेत आहेत. हळदोण येथे देखील १० ते १५ रुग्णवाहिका बिघडलेल्या आढळतात. या रुग्णवाहिकेंची जर का डागडुजी केली तर नागरिकांपर्यंत उत्तम सेवा पोहोचवता येऊ शकते. संबंधित अधिकाऱ्यांनी या बिघडलेल्या अवस्थेतील रुग्णवाहिकांकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक बदल करून पुन्हा सेवेत रुजू करावी अशी मागणी केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवोलीत म्हणावी तशी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध नाही. त्यांना शेजारच्या भागांमधून रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागते. लवकरात-लवकर शिवोली हेल्थ सेंटरला एक रुग्णवाहिका द्यावी, तसेच राज्यात असलेली रुग्णवाहिकेची कमतरता भरून काढण्यासाठी नादुरुस्त अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकांची दुरुस्ती करावी अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT