Mahadayi Water Dispute |Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई आंदोलनाला सर्वपक्ष एकवटले; भाजपचा याला पाठिंबा आहे का ?

पक्षीय हालचाली सुरू; ‘सेव्ह म्हादई सेव्ह, गोवा’ मंचाला तृणमुलचा पाठिंबा

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: राज्यात म्हादई आंदोलनाची सूत्रे ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ या मंचाकडे आहेत. या मंचाच्या आंदोलनाला विविध पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी भाजपच्या भूमिकेकडे अजूनही सर्वांच्या नजरा आहेत. सध्या आंदोलनातील हवा निघून गेली की काय, अशी स्थिती असताना राजकीय पक्षांत काय चालले आहे, याविषयी घेतलाला हा आढावा

तालुकास्तरीय बैठका महत्त्वाच्या

पक्ष म्हणून आंदोलनात वेगळे राहून चालणार नाही. संघटितपणे आंदोलन पुढे नेणे गरजेचे असते, त्यामुळेच तृणमूल काँग्रेसने ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ मंचाला पाठिंबा दिला. 16 तारखेच्या सभेनंतर म्हादईप्रश्‍नी सुरू झालेल्या चळवळीने अधिक गतीने जोर धरायला हवा होता. तृणमूल काँग्रेस या चळवळीच्या पाठीशी आहे.

मायक्रो लेव्हलवर अत्यंत गंभीरपणे ही चळवळ राबवायला हवी, त्यात तृणमूलचा नक्कीच वाटा असेल, असे प्रदेशाध्यक्ष समील वळवईकर यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांना पाठिंबा

गोवा फॉरवर्डने म्हादईप्रश्‍नी कर्नाटकला डीपीआरला मंजुरी मिळाल्यापासून सरकारवर सडेतोड टीका करण्याची संधी सोडलेली नाही. साखळीतील सभेलाही या पक्षाने पाठिंबा दिला. या सभेच्या आयोजनामागे गोवा फॉरवर्ड पक्षच असल्याचे बोलले गेले असले तरी त्याकडे लक्ष न देता पक्षाने म्हादईप्रश्‍नी आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला आहे.

जो निर्णय आंदोलनकर्ते घेतील, त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णयही कार्यकारिणीच्या बैठकीत झाल्याचे विजय सरदेसाई यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.

काँग्रेसचा जागोर सुरू

काँग्रेस पक्षाने म्हादई वाचविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता ‘म्हादई जागो’र हे अभियान २६ जानेवारीपासून पणजीतील आझाद मैदानावरून सुरू केले आहे. पक्षाची सध्या ‘हाथ से हाथ जोडो’ हे अभियान सुरू झालेले आहे. त्याच्या अनुषंगानेच म्हादई जागोर करण्याचेही पक्षाने हाती घेतले आहे.

नुकतेच दक्षिण गोव्यातील वेळ्ळी या ठिकाणी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाबरोबर म्हादईविषयी जागृती केली. पक्षाने यापूर्वीच म्हादईविषयी ज्या बिगर सरकारी संस्था, पर्यावरणप्रेमी भूमिका घेतील, त्यांच्या पाठीशी राहण्याचे निश्‍चित केल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर सांगतात.

राष्ट्रवादीचे चळवळीकडे लक्ष

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद नाही. म्हादईप्रश्‍नी जे आंदोलन सुरू आहे, त्याची धग जाणवली पाहिजे. त्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करायला हवा, आम्ही लोकांबरोबर आहोत आणि या चळवळीकडे लक्ष ठेवून आहोत, असे माजी आमदार तथा पक्षाचे नेते जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले.

लवकरच कृती ठरविणार- आप

आम आदमी पक्षाने पूर्णतः एनजीओंच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आमच्या सुकाणू समितीची बैठकही मंगळवारी होईल. त्याशिवाय तिसवाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होईल.

त्या बैठकीत कृती ठरविली जाणार आहे. एनजीओंनी सुरू केलेल्या या आंदोलनाच्या पाठीशी पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत आणि राहणार आहेत. बैठकांद्वारे जागृतीवर भर दिला असल्याचे ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.

कोणतीच कारवाई नाही: अमित शहा यांच्या कर्नाटकातील वक्तव्यानंतर राज्यातील भाजप सरकारची स्थिती ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही. मात्र, मंत्री नीलेश काब्राल आणि जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

मंत्र्यांनी केलेला निषेध बहुतेकदा भाजपचीच खेळी असल्याची चर्चा आहे. कारण आतापर्यंत कारवाई करायची झाली असती, तर मंत्र्यांना कधीच जाब विचारला गेला असता. परंतु तसे झाले नाही.

शिवसेनाही सहभागी

राज्यात फार अस्तित्व नसलेली शिवसेनाही म्हादईप्रश्नी आंदोलनात सहभागी झाली आहे. म्हादई वाचवण्याचा प्रश्न आल्याने राज्यप्रमुख या नात्याने जितेश कामत हे विरोधी राजकीय पक्षाच्या बरोबर राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT