Goa Agriculture | Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: बागायतदारांनी नारळ उत्पादनवाढीवर भर द्यावा- रमेश तवडकर

Goa Agriculture: केरळ सारख्या राज्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नारळाचे उत्पन्न वाढवले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: नवे तंत्रज्ञान वापरून नारळाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच नारळाच्या अन्य भागापासून कसा जोड धंदा करता येईल, यावर नारळ बागायतदारांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी बड्डे- खोतीगाव येथे व्यक्त केले. कृषी खाते तसेच नारळ विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

केरळ सारख्या राज्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नारळाचे उत्पन्न वाढवले आहे, त्याच अनुषंगाने गोवा सरकार कार्यरत आहे, असे सभापतीनी सांगितले.यावेळी कृषी उपसंचालक संदीप फळदेसाई , विभागीय कृषी अधिकारी कीर्तीराज नाईक गावकर, सहसंचालक जेनीस अल्फान्सो, कार्यक्रमाचे संयोजक गिरीश केंकरें,खोतीगावचे सरपंच आनंदु देसाई,उपसरपंच पूनम गावकर, पंच शर्मिला गावकर, वृंदा वेळीप , कृष्णा गावकर , जयेश गावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी सभापतींच्या हस्ते माडावर चढण्याच्या यंत्राचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सुप्रिया गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT