Goa  Action will be taken under the Disaster Management Act for denying admission to a patient
Goa Action will be taken under the Disaster Management Act for denying admission to a patient 
गोवा

Goa: रुग्‍णाला प्रवेश नाकारल्याची आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यान्‍वये कारवाई

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : खासगी इस्पितळातील खाटा सरकारने(Goa government) ताब्यात घेतल्यानंतर कोविड रुग्णाला त्या इस्पितळात प्रवेश नाकारल्याची एकही घटना घडलेली नाही. खासगी इस्पितळांशी कोणी दूरध्वनीवर संपर्क साधला, तर खाटा नाहीत असे सांगण्याचा खोडसाळपणा केला गेला असेल. पण, प्रवेश नाकारल्याची एकही तक्रार सरकारकडे आलेली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.(Goa  Action will be taken under the Disaster Management Act for denying admission to a patient)

ते म्हणाले, प्रत्येक खासगी इस्पितळात सरकारी कर्मचारी कोविड रुग्ण दाखल करून घेण्यासाठी नियुक्त केले आहेत. या सर्व यंत्रणेवर उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांचे लक्ष आहे. ठराविक कालावधीनंतर उपलब्ध खाटा किती आहेत, याचा आढावा घेण्यात येतो. त्यामुळे खासगी इस्पितळांत खाटा नाहीत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय ‘इस्पितळात जा’ असे कोणाला सांगितले गेलेले नाही.

...तर आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यान्‍वये कारवाई?
कोणत्याही कोविड रुग्णाला परत पाठवले जाऊ नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आल्‍याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, खासगी इस्पितळांची दूरध्वनी सेवा ही त्यांच्याच ताब्यात आहे. तीही सरकारने ताब्यात घ्यावी असे कोणी म्हणत असेल, तर ते खासगी इस्पितळच सरकारने चालवल्यासारखे होईल. आम्ही केवळ कोविड रुग्ण दाखल करून घेण्याची आणि रुग्णाला दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत पूर्णतः मोफत उपचार देण्याची हमी घेतली आहे. त्यानुसार रुग्णांना खासगी इस्पितळात दाखल करून घेतले जाते आणि त्यांच्यावर उपचारही होतात. खासगी इस्पितळांनी कोविड रुग्णांना प्रवेश नाकारू नये, त्यांना खाटा उपलब्ध नाहीत, असे सांगू नये. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती तेथे केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली ‘त्या’ कर्मचाऱ्यांकडे तत्काळ कारवाई करण्याचे अधिकारही दिलेले आहेत. त्यामुळे राज्यभरात कुठेही कोविड रुग्णाला इस्पितळात दाखल करून घेण्याचे नाकारण्यात आलेले नाही.

लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड निगा केंद्रे

गंभीर नसलेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी भरतीपूर्व कोविड इस्पितळे सरकारने सुरू केली आहेत. जास्त लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड निगा केंद्रे सुरू केली आहेत. आमदार, मंत्री यांनी रुग्णवाहिका सेवा व कोविड निगा केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे राज्याच्या कोविड व्यवस्थापनाविषयी कोणी आता प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. मध्यंतरी काही प्रश्न जरुर होते, मात्र आता त्यातून मार्ग काढण्यात आल्‍याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT