Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: शिवोली पुलावर भीषण अपघात; कार आणि कदंब बसची समोरासमोर धडक, वाहतुकीचा मोठा खोळंबा

Goa Accident News: पुलावर आज एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या कदंब बसला जोरदार धडक दिली.

Sameer Amunekar

शिवोली: पुलावर आज एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या कदंब बसला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

भीषण धडक आणि स्थानिकांची मदत

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवोली पुलावरून जात असताना एका कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार थेट समोरून येणाऱ्या सरकारी कदंब बसवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर पुलावर मोठी गर्दी जमली. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच, स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था स्वतः हाताळली.

वाहतुकीचा मोठा खोळंबा

हा अपघात पुलाच्या मध्यभागी झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिओलीम आणि चोपडे या भागांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने कामावर जाणारे कर्मचारी आणि पर्यटकांना याचा मोठा फटका बसला. सुदैवाने, या अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT