Goa Accident News  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Brother sister injured Goa accident: अपघातात दुचाकीवरील दोघेही भावंडे गंभीर जखमी झाली. तसेच त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: पर्रा-बार्देश येथे पर्यटक चालवत असलेल्या 'रेंट अ कॅब'ची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने भाऊ-बहीण गंभीर जखमी झाली. या दोघांवर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये रेवोडा येथील १३ वर्षीय नरेंद्र चव्हाण व २१ वर्षीय निकिता चव्हाण हिचा समावेश आहे. भाऊ हा शाळेला जात होता तर बहीण बागा येथे कामाला जात होती. अपघातानंतर कारचालकाने गाडीसह पळ काढला.

उपलब्ध माहितीनुसार, हा अपघात आज सोमवारी (ता. १७) सकाळी घडला. कळंगुट हून पर्राच्या दिशेने वेगाने येणाऱ्या 'रेंट अ कॅब' असलेल्या थार कारची जोरदार धडक म्हापशाहून कळंगुटच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला बसली.

यात दुचाकीवरील दोघेही भावंडे गंभीर जखमी झाली. तसेच त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून आधी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात, नंतर गोमेकॉत नेण्यात आले

दरम्यान, अपघातस्थळावरुन पळ काढलेली कारगाडी ही मोपा विमानतळाजवळील रस्त्यालगत आढळली. पोलिसांनी ती आपल्या ताब्यात घेऊन म्हापसा पोलिस स्थानकावर आणली.

पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत. संशयित कारचालक हा पर्यटक असून, त्याने ही गाडी कळंगुट येथून भाड्याने घेतली होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT