Goa Accident : खड्ड्यांची समस्याच अपघातांना कारणीभूत ठरत असून खड्डेमुक्त राज्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरल्याने प्रवाशांचा जीव कवडीमोल ठरला आहे. Dainik Gomantak
गोवा

खड्डे गोल-गोल; जीव कवडीमोल!

महिनाभरात सहा जण ठार : रस्त्यांची दुरवस्था, वाहनांचा वेगही कारणीभूत

दैनिक गोमन्तक

पणजी (Panjim) : नुकताच राज्यभर रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. पण, या काळातच सर्वाधिक अपघात घडल्याचे (Goa Accident) दिसून येते. खड्ड्यांची समस्याच अपघातांना कारणीभूत ठरत असून खड्डेमुक्त राज्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरल्याने प्रवाशांचा जीव कवडीमोल ठरला आहे.

अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्याकडून प्रयत्न केले जात असले तरी खड्ड्यांमुळे तसेच वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या महिनाभरात राज्यात 15 हून अधिक अपघात झाले असून यामध्ये सहा जण ठार तर 25 जण जखमी झाले आहेत. अपघातांचे हे सत्र सुरूच असून त्यावर नियंत्रण आणण्यात प्रादेशिक वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांना अपयश आले आहे.

अद्यापही खड्ड्यांचेच साम्राज्य : राज्यात बहुतेक सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना नेहमीच्याच बनल्या आहेत. खड्डे चुकविताना इतर वाहनांना धडकून वाहनचालकांना जीव गमवावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि साबांखा मंत्र्यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. ती हवेत विरली अाहे.

महिन्यातील दुर्घटना

भोम येथे फोंडा-पणजी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचे निधन

बोरीत ट्रक कलंडून चालक जखमी

सांगोल्डात ट्रक उलटून चालक जखमी

डिचोलीत दुचाकीला वाहनाची धडक : दुचाकीस्वार जखमी

पांजरखणी येथे दुचाकीवरून पडून फ्रेंक्लिना फर्नांडिस यांचा मृत्यू

गोमेकॉसमोर रुग्णवाहिकेने ट्रकला धडक दिल्याने रुग्णाचा मृत्यू

गिरी-म्हापसा येथे बस-दुचाकी अपघातात एक ठार

भिरोंडा येथे कदंब-टेम्पो ट्रॅव्हलर धडक, 13 प्रवासी जखमी.

चेतन लक्केबैलकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT