Accident Death Dainik Gomantak
गोवा

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Marcel Jeep Motorcycle Accident: सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील रहिवासी महादेव चंद्रकांत सावंत (वय 45) यांचा गोव्यातील माशेल परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला.

Sameer Amunekar

सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील रहिवासी महादेव चंद्रकांत सावंत (वय 45) यांचा गोव्यातील माशेल परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे डिंगणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कामावर जात असताना काळाचा घाला

महादेव सावंत हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून डिंगणे येथून गोव्यातील कामाच्या ठिकाणी जात होते. माशेल परिसरात पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

गोवा पोलिसांची कारवाई

अपघाताची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी संबंधित जीपचालकासह एकूण तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT