Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव वाहनाच्या धडकेत गाईसह 4 वासरांचा मृत्यू; पांजरखणी कुंकळी येथे पहाटे अपघात

मडगाव-काणकोण महामार्गावरील घटना

Akshay Nirmale

Goa Accident: मडगाव-काणकोण महामार्गावर पांजरखणी कुंकळी येथे झालेल्या अपघातात एका गाईसह चार वासरांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी पहाटे ही बाब लक्षात आली. अज्ञात वाहनाने या जनावरांना धडक दिल्याचे दिसते.

ही भटकी जनावरे आहेत. त्यांच्यावर अद्याप तरी कुणीही मालकी सांगितलेली नाही. मंगळवारी पहाटे ही जनावरे रस्त्यावरच मृतावस्थेत पडून होती. सकाळी स्थानिक नागरिकांनी ती रस्त्याच्या बाजूला आणली.

स्थानिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे वारंवार असे अपघात घडत असतात. त्यामुळे पालिकेने ठोस काहीतरी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

दररोजचा त्रास असूनही पालिका काहीही कारवाई करत नाही. भटक्या जनावरांना पकडण्यासाठी खास कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येथे भटक्या जनावरांसाठी कॅटल पाँडदेखील आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक अॅड. रेश्मा देसाई म्हणाल्या की, हे आता खूप झाले आहे. दररोज असे प्रकार घडत असतात. दररोज अपघात होत असतात. नगरपालिकेने काहीतरी ठोस कारवाई करावी. आज चार ते पाच जनावरांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT