Goa Accidents Case | Accident Case in Goa | Goa Accidents Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents : गोव्यात अपघातसत्र थांबेना! वीज खांब मोडून पोलीस कर्मचाऱ्याची कार ओहोळात पलटली

डिचोली-साखळी रस्त्यावर अपघात, कारचालक सुखरूप

दैनिक गोमन्तक

Goa Accidents Case : गोव्यातील रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस वाहनचालकांवर कारवाईत करत दंड वसूल करत आहेत. डिचोली-साखळी रस्त्यावर विजयनगर-कारापूर येथे वीज खांब मोडून मोटारगाडी ओहोळात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयानक अपघातात कारचालक सुदैवाने सुखरूप बचावला.

मोटारगाडीचा मात्र चक्काचूर झाला. हा अपघात काल (सोमवारी) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात सुखरूप बचावलेला युवक पोलीस खात्यात सेवेत असल्याची माहिती मिळाली आहे. मोटारगाडीने प्रथम वीज खांबाला धडक दिली. नंतर ती जाऊन ओहोळात कोसळली. माहितीनुसार, चालकाला झोप लागली आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला.

दरम्यान, तब्बल 2 कोटी किमतीची सुपरकार Nissan GTR आणि मारुती कारचा भीषण अपघात झाला आहे. बोरी-वेर्णा रस्त्यावर स्पोर्ट्स कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची मारुती ओमनीला आणि स्कूटरला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात तिन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT