ACB  Dainik Gomantak
गोवा

ACB : लाचखोर आयटी अधिकाऱ्याविरुद्ध एसीबीकडून भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद

ACB : संशयिताच्या मालेमत्तेसंदर्भातही चौकशी सुरू केली जाईल. त्यामुळे संशयित सिद्धार्थ बोरकर हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

Ganeshprasad Gogate

ACB : माहिती तंत्रज्ञान खात्यात कंत्राटी पद्धतीवरील नोकरीसाठी १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी निलंबित झालेल्या आयटी उपसंचालक सिद्धार्थ बोरकर याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दक्षता खात्याच्या लाचलुचतविरोधी विभागामार्फत (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला चौकशीसाठी लवकरच समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लाचखोर अधिकारी बोरकर व नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये झालेल्या संभाषणांची ऑडिओ कॉपी लाचलुचपतविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यातील संभाषणाची सविस्तर माहिती नोंद केली आहे.

ज्या उमेदवाराने हा ऑडिओ तयार केला त्यालाही बोलावून जबानी नोंद केली जाणार आहे तसेच ऑडिओ रिकॉर्डिंग केलेला मोबाईलही चौकशीसाठी ताब्यात घेतला जाणार आहे. या दोघांच्या आवाजाचीही चाचणी घेऊन ती फोरेन्सिक लेबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठविली जाणार आहे.

संशयिताच्या मालेमत्तेसंदर्भातही चौकशी सुरू केली जाईल. त्यामुळे संशयित सिद्धार्थ बोरकर हे चांगलेच अडचणीत आले आहेत. प्रकरणाची सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.

आयटी खात्यात कंत्राटी पद्धतीवर जागा भरायच्या असल्याने एका उमेदवाराने या आयटी अधिकाऱ्याशी संपर्क साधला.

नोकरी हवी असल्यास एक लाख रुपये द्यावे लागतील. त्यातील अर्धी रक्कम मुलाखतीपूर्वी व उर्वरित रक्कम नोकरीसाठीचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर द्यावे लागतील. नोकरी न मिळाल्यास रक्कम परत केली जाईल.

ही रक्कम एका तासातच दिल्यास ही जागा निश्‍चित होईल अन्यथा काहीजण पैसे देण्यास तयार आहेत, त्यांना दिली जाईल असे त्या उमेदवाराला सांगितले.

या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्वरित सरकारी पातळीवर हालचाली होऊन त्या अधिकाऱ्यावर काल दक्षता खात्याने कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa Wildlife: गोव्याचा 'गवा' राज्य प्राणी का? जंगलतोड, काजू बागायती अन् पाण्याच्या शोधात वाढतोय मानव-गवा संघर्ष

Wildlife Conservation: गोव्याच्या जंगलात दुर्मिळ जीवांचे अस्तित्व धोक्यात; वन्यजीव सप्ताहात अधिवास वाचवण्याचा संदेश

VIDEO: रक्ताने माखलेला गणवेश आणि गुडघ्यावर बसलेला हल्लेखोर! कॉकपिटच्या आत नक्की काय घडलं? फ्लाय दुबईच्या विमानातील नवा व्हिडिओ आला समोर

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

SCROLL FOR NEXT