Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: राज्यात खून - दरोडा- चोऱ्यांचे सत्र सुरूच, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस प्रशासन हतबल

Goa Crime Case: सीसीटीव्ही फुटेज आधारे हणजुण पोलिस तपास करीत आहेत

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: राज्यात चोऱ्या, हाणामारी, खून यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे बोलले जातेय.

काही महिन्यांपूर्वी कांदोळी येथे घडलेले आणि देशभरात गाजलेले सूचना सेठचे प्रकरण काहीसे शमते तोच काही दिवसांपूर्वी पेडा - बाणावली येथील खून प्रकरणाने गोवा पुन्हा एकदा चर्चेचे कारण बनला आहे.

पेडा-बाणावली येथील विश्वनाथ सिधनल यांच्या खूनप्रकरणी सूरज मायगेरी (कडोळी, बेळगाव) याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विश्वनाथ सिधनल खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असून विश्‍वनाथची पत्‍नी वैभवी हिचे आणखी एका युवकाशी सूत जमले होते. त्‍या संबंधात विश्‍वनाथचा अडथळा येत असल्‍यामुळे आपल्‍या प्रियकराच्याच मदतीने तिने विश्‍वनाथचा काटा काढला हे उघड झाले आहे.

खुनाच्या घटनांसोबतच राज्यात चोऱ्यांचे सत्रही मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. मार्ना-शिवोली येथील ‘कॅन्टेम्पो’ या आलिशान बंगल्यात बुधवारी रात्री चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे 11 लाख 61 हजार रुपयांचे सोने तसेच 3 लाख 15 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

चोरीची ही घटना शुक्रवारी पहाटे तीन ते सव्वासहाच्या दरम्यान करण्यात आली. सार्थक राजेश कुमार गुप्ता यांच्या आलिशान सदनिकेत ही चोरीची घटना घडली आहे.

यासंबंधी हणजुण पोलिसांत घरमालक गुप्ता यांनी रितसर तक्रार दाखल केली असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुराव्यांच्या आधारे हणजुण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संकेत पोखरे, निरीक्षक प्रशाल देसाई तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

दरम्यान, मार्ना- शिवोली परिसरात परप्रांतीय दिल्लीस्थित बिल्डर लोकांकडून आलिशान रहिवासी बंगले उभारण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या नसल्याचे स्थानिक पंच सदस्य विलीयम फर्नांडिस यांनी सांगितले.

या परिसरात कायमस्वरूपी पोलिस गस्त ठेवण्याबरोबरच खासगी रहिवासी इमारत मालकांनी आपापल्या जागेत सीसीटव्ही कॅमेरे लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT